Mumbai Crime : 'तुझं नाव मी चिठ्ठीत लिहून...', अनंत गर्जेने दिली होती डॉक्टर गौरीला धमकी! इथून सुरू झाला संसाराचा काडीमोड
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
PA Anant Garje threatened Dr Gauri : तुझं नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीन, अशी धमकी अनंतने दिल्याचं गौरीने आई - वडिलांना सांगितलं होतं.
Mumbai Crime News : भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी गुरुवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केईएम रुग्णालयातील दंतवैद्यक विभागात डॉक्टर असलेल्या गौरी गर्जे (Gauri Garje) प्रचंड तणावात होत्या. अशातच पत्नीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जे यांना अटक करम्यात आली आहे. मात्र, दोघांमधील भांडण सुरू कधी झालं? याची खुलासा झालाय.
गौरीला मारहाण करायचा अनंत?
दोन महिन्यांपासून गौरी आणि तिच्या नवऱ्याचा वाद सुरु होता, अशी माहिती गौरीच्या कुटूंबियांनी दिली आहे. मागील महिन्यात 3 ऑक्टोबर रोजी अनंतच्या वाढदिवसानिमित्ताने आई-वडिलांनी काहीही न कळवता जेव्हा तिचं घर गाठलं. तेव्हा, गौरी हिच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले. आई-वडिलांना पाहून ती घाबरली. तुम्ही जा, असं ती सांगत होती, त्यावेळी आई-वडिलांना संशय आल्यानंतर त्यांनी लेकीकडे विचारपूस केली होती.
advertisement
गर्भवती महिलेचे संमतीपत्र आणि जाहीरनामा
अनंतने छोट्या छोट्या कारणातून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यात, घराच्या शिफ्टिंगदरम्यान हाती लागलेल्या कागदपत्राने तिच्या पायाखालची जमीन सरकली. 2021 रोजीचे लातूरच्या एका गर्भवती महिलेचे संमतीपत्र आणि जाहीरनामा होता. त्यात, महिलेच्या पतीचे नाव अनंत गर्जे असं नमूद होतं. त्यामुळे अनंतने आपल्याला धोका दिलाय, असा संशय अनंतला होता.
advertisement
तुला काय करायचे ते कर...
दरम्यान, अनंतकडे या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर त्याने याबाबत तुला काय करायचे ते कर, मी कोणाला घाबरत नाही, याबाबत कोणाला सांगितलं तर, तुझं नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्याचे तिने आई - वडिलांना सांगितले. त्याने मारहाण केल्याचेही गौरीने सांगितलं होतं.
पंकजा मुंडेंची भूमिका काय?
advertisement
दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी साडे सहा ते पावणे सातच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2025 9:55 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : 'तुझं नाव मी चिठ्ठीत लिहून...', अनंत गर्जेने दिली होती डॉक्टर गौरीला धमकी! इथून सुरू झाला संसाराचा काडीमोड


