Mumbai Crime News: मामा- मामीने केला घात, 5 वर्षाच्या भाचीचा कैला सौदा; 80 हजारासाठी जे काही केलं ते ऐकून पोलीस हादरले
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबईतल्या अंधेरीत असलेल्या वाकोला पोलिसांनी पाच वर्षीय चिमुकलीची दोनदा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतल्या अंधेरीत असलेल्या वाकोला पोलिसांनी पाच वर्षीय चिमुकलीची दोनदा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. वाकोला पोलिसांना पाच वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण झाल्याची माहिती मिळाली. मुलीची विक्री करणाऱ्या टोळीची मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अंधेरीतल्या वाकोल्यातून 5 वर्षीय चिमुकली बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपास करताना मुलीच्याच मामा आणि मामीने तिचे अपहरण करून तिला विकल्याची धक्कादायक बाब उघड झाली. ज्या रिक्षातून मुलीला वाकोला ते पनवेल नेलं गेलं त्या रिक्षावाल्याला ट्रेस करत तपासाला पोलिसांनी सुरुवात केली. मामा लोरन्स फर्नांडेस - वय 42 आणि मंगल जाधव - वय 38 यांची झाडाझडती घेतली तेव्हा त्यांनी त्या मुलीला करण नावाच्या व्यक्तीला 80 हजारात विकल्याची माहिती मिळाली.
advertisement
पोलिसांनी पनवेलमध्ये जात करणच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिवाय, त्याच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. ती म्हणजे, करणने सुद्धा आणखी एका टोळीकडे त्या पाच वर्षीय चिमुकलीची विक्री केली होती. करणने त्या मुलीचे तिप्पट पैसे मिळवण्याच्या विचारात होता. त्याने पाच वर्षीय चिमुकलीचा थोडा थाडका नाही, तब्बल 1 लाख 80 हजारात तिचा सौदा केला. त्याने त्या चिमुकलीला पुढच्या पार्टीला विकल्याची बाब सामोरं आली. त्या चिमुकलीला कोणी विकत घेतले याची माहिती देखील समोर आली आहे.
advertisement
करणने अंजली कोरगावकर (वय 57) आणि वृंदा चव्हाण (वय 60) यांना ती पाच वर्षीय चिमुकली विकली. या महिलांनी ती चिमुकली विकत घेतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अंजली यांच्या घरी धाड टाकत त्या 5 वर्षीय मुलीची सुखरूप सुटका केली. सध्या पोलिस करण आणि अंजली यांची चौकशी करीत आहे. अपहरण आणि विक्री नेमक्या कोणत्या कारणास्तव पाच वर्षीय चिमुकलीची विक्री केली? याचा तपास सध्या मुंबई पोलिसांकडून केला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 4:37 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime News: मामा- मामीने केला घात, 5 वर्षाच्या भाचीचा कैला सौदा; 80 हजारासाठी जे काही केलं ते ऐकून पोलीस हादरले


