मालकाचा विश्वास, चालकाचा घात! विमानतळाजवळ पिकअप सोडून चालक फरार, आतलं लाखोंचं सामान केलं लंपास
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने मालकाचा विश्वासघात करत सव्वा लाखांच्या मालाचा अपहार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पिंपरी : गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने मालकाचा विश्वासघात करत सव्वा लाखांच्या मालाचा अपहार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिकअप गाडीतून नेण्यात येणारे लोखंडी सुटे भाग (Parts) कंपनीत न पोहोचवता, चालकाने त्यांची परस्पर विक्री केली आणि गाडी रस्त्यावर सोडून तो फरार झाला आहे.
नेमकी घटना काय?
सोनल बलभीम अरडे (वय ३१, रा. चाकण) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या बोलेरो पिकअप गाडीवर इरफान अन्सारी (वय २६, रा. उत्तर प्रदेश) हा चालक म्हणून काम करत होता. ९ फेब्रुवारी रोजी गाडीमध्ये १ लाख ५० हजार रुपये किमतीचे लोखंडी सुटे भाग भरले होते. हा माल मोशी येथून नऱ्हे येथील एका कंपनीत पोहोचवण्याचे काम इरफानला देण्यात आले होते.
advertisement
गाडी मुंबईत सापडली, माल गायब
माल वेळेवर पोहोचला नसल्याने मालकांनी तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी इरफानने तो माल नऱ्हेला पोहोचवलाच नाही. त्याने वाटेतच त्या लोखंडी भागांची परस्पर विक्री करून पैसे खिशात घातले. एवढेच नाही तर, चोरी पकडली जाऊ नये म्हणून त्याने पिकअप गाडी चक्क नवी मुंबई विमानतळाजवळ सोडून दिली आणि तिथून पळ काढला.
advertisement
पोलिसांत गुन्हा दाखल
गाडी बेवारस स्थितीत सापडल्यानंतर आणि त्यातील दीड लाखांचा माल गायब असल्याचे स्पष्ट झाल्यावर, भोसरी एमआयडीसी पोलिसांनी इरफान अन्सारीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वतःच्याच मालकाला चुना लावून पसार झालेल्या या चालकाचा पोलीस आताऐ शोध घेत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 2:00 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मालकाचा विश्वास, चालकाचा घात! विमानतळाजवळ पिकअप सोडून चालक फरार, आतलं लाखोंचं सामान केलं लंपास









