Mumbai News : संसाराला अवघे तीन वर्ष! पतीने घेतला पत्नीचा जीव,धक्कादायक कारण उघड

Last Updated:

Mumbai Crime : गोवंडीत संशयातून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने मारहाण केल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाला. शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला काही तासांत अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईतील गोवंडी परिसरात एका तरुणाने संशयाच्या भरात आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पतीला अवघ्या काही तासांत अटक केली आहे. हुसैन (वय 23) असे आरोपीचे नाव असून त्याने आपल्या 20 वर्षीय पत्नी नाजियाचा जीव घेतल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाजियाने आपल्या पतीला मोबाईलवर दुसऱ्या महिलेशी बोलताना पाहिले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की रागाच्या भरात हुसैनने नाजियाला जबर मारहाण केली. या मारहाणीत नाजियाचा जागीच मृत्यू झाला.
नाजिया आणि हुसैन यांचे 2023 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर ते मुंबईत वास्तव्यास होते. मात्र, काही काळापासून घरगुती कारणांवरून त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. हुसैन दुसऱ्या महिलेच्या संपर्कात असल्याचा संशय नाजियाला होता. हाच संशय तिच्या मृत्यूचे कारण ठरला.
advertisement
या प्रकरणी समतुल्लाह शेख (वय 35) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. गोवंडीतील या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : संसाराला अवघे तीन वर्ष! पतीने घेतला पत्नीचा जीव,धक्कादायक कारण उघड
Next Article
advertisement
BMC  Election : BMC साठी काँग्रेससोबत आघाडीसाठी राऊतांची फोनाफोनी, दिल्लीतून सूत्रं हलली; काँग्रेसचं नेमकं काय ठरलं?
BMC साठी काँग्रेससोबत आघाडीसाठी राऊतांची फोनाफोनी, दिल्लीतून सूत्रं हलली; काँग्र
  • BMC साठी काँग्रेससोबत आघाडीसाठी राऊतांची फोनाफोनी, दिल्लीतून सूत्रं हलली; काँग्र

  • BMC साठी काँग्रेससोबत आघाडीसाठी राऊतांची फोनाफोनी, दिल्लीतून सूत्रं हलली; काँग्र

  • BMC साठी काँग्रेससोबत आघाडीसाठी राऊतांची फोनाफोनी, दिल्लीतून सूत्रं हलली; काँग्र

View All
advertisement