OTT वर माधुरी दीक्षितची जादू; Mrs Deshpande रिलीज होताच ठरली नंबर वन, केला हा रेकॉर्ड
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Most Watched Shows on OTT: ओटीटीवर अनेक नव्या वेब सीरिज रिलीज झाल्या आहेत. प्रत्येक सीरिज एकापेक्षा एक खास असून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. मागील आठवड्यात व्ह्यूजच्या बाबतीत कोणती सीरिज आघाडीवर होती, ते जाणून घ्या. आता ऑरमॅक्स मीडियाच्या रिपोर्टनुसार 15 ते 21 डिसेंबरदरम्यान कोणत्या सीरिजने प्रेक्षकांचे सर्वाधिक मनोरंजन केले जाणून घ्या.
advertisement
माधुरी दीक्षित 'मिसेज देशपांडे' या सीरिजमध्ये पहिल्यांदाच सीरियल किलरच्या भूमिकेत दिसत आहे. रिलीजच्या आधीपासूनच जिओ हॉटस्टारवरील या सीरिजची सर्वत्र चर्चा होती. कथेमुळे प्रेक्षक इतके प्रभावित झाले की मागील आठवड्यात सर्वाधिक व्ह्यूज या सीरिजने मिळवले. ऑरमॅक्स मीडियानुसार ‘मिसेस देशपांडे’ला जिओ हॉटस्टारवर 3.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत हा व्ह्यूजचा आकडा आणखी वाढेल.
advertisement
advertisement
स्ट्रेंजर थिंग्स 5 (Stranger Things Season 5) : हॉलिवूडची लोकप्रिय सीरिज ‘स्ट्रेंजर थिंग्स’चा अंतिम सीझनही ओटीटीवर रिलीज झाला आहे. या सीझनची कथा चौथ्या सीझनमधील घटनांनंतर 18 महिन्यांनी सुरू होते, जिथे इलेव्हनचा एकच उद्देश आहे – वेक्नाला शहराबाहेर हाकलणे. 27 नोव्हेंबरपासून ही सीरिज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत असून मागील आठवड्यात ऑरमॅक्स मीडियानुसार तिला 2.2 मिलियन व्ह्यूज मिळाले.
advertisement
द फॅमिली मॅन सीझन 3 (The Family Man Season 3) : मनोज बाजपेयी अभिनीत 'द फॅमिली मॅन सीझन 3' या सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी श्रीकांत तिवारी स्क्रीनवर परतताच त्यांनी सगळी लाइमलाइट आपल्या नावावर केली. प्राइम व्हिडिओवर ही सीरिज प्रचंड पसंत केली जात आहे. व्ह्यूअरशिपबद्दल बोलायचे झाल्यास मागील आठवड्यात ऑरमॅक्स मीडियानुसार या सीरिजला 2.1 मिलियन व्ह्यूज मिळाले.
advertisement
सिंगल पापा (Single Papa) : कुणाल खेमूची 'सिंगल पापा' ही कॉमेडी सीरिज म्हणजे मनोरंजनाचा परफेक्ट डोस आहे. कुणाल खेमूसोबत प्राजक्ता कोळी, मनोज पहवा आणि नेहा धूपिया हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. परफेक्ट ह्युमर आणि सिंगल फादर्सची कथा असलेली ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. मागील आठवड्यात ऑरमॅक्स मीडियानुसार तिला 1.5 मिलियन व्ह्यूज मिळाले.
advertisement
भय : द गौरव तिवारी मिस्ट्री (Bhay : The Gaurav Tiwari Mystery) : ओटीटीवर सर्वाधिक आवडला जाणारा जॉनर म्हणजे हॉरर थ्रिलर. याच प्रकारातील ही सीरिज सत्य घटनांवर आधारित आहे. ही कथा भारतातील प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर गौरव तिवारी यांच्याभोवती फिरते. ही सीरिज एमएक्स प्लेयरवर उपलब्ध असून मागील आठवड्यात तिला 1.4 मिलियन व्ह्यूज मिळाले.











