टेलिग्रामवर एक मेसेज आला अन् घात झाला, मुंबईच्या महिलेनं गमावले 49 लाख

Last Updated:

मुंबईच्या घाटकोपरमध्ये एका गृहिणीला टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली तब्बल ४९ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

News18
News18
मुंबई: दिवसेंदिवस सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या लढवत आहेत. 'वर्क फ्रॉम होम' किंवा 'पार्टटाइम नोकरी'चं आमिष दाखवून नागरिकांचं बँक खाते रिकामे करण्याच्या घटना वाढत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील घाटकोपर येथे उघडकीस आली आहे, जिथे एका गृहिणीला टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली तब्बल ४९ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाची नोंद पूर्व प्रादेशिक सायबर पोलिसांनी केली असून, एकूण सात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय घडला?

तक्रारदार महिला घाटकोपर येथील रहिवासी असून त्या गृहिणी आहेत. गेल्या महिन्यात त्यांना टेलिग्राम आयडीवरून एक संदेश आला, ज्यात 'वर्क फ्रॉम होम' करण्याची संधी असल्याचं सांगण्यात आलं. सायबर ठगांनी त्यांना सुरुवातीला युट्यूबवरील व्हिडिओ लाईक करण्याचे सोपे टास्क दिले. प्रत्येक लाईकसाठी ४० रुपये मिळतील, असं आमिष दाखवण्यात आलं.
advertisement
सुरुवातीला काही टास्क पूर्ण झाल्यावर त्यांच्या खात्यात पैसे जमाही झाले, ज्यामुळे त्यांचा विश्वास वाढला. त्यानंतर ठगांनी त्यांना विविध 'प्रीमियम टास्क' पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितलं. घरबसल्या जास्तीचे पैसे कमवण्याची संधी असल्याने महिलेने कोणताही विचार न करता टास्कसाठी होकार दिला आणि पैसे भरायला सुरुवात केली.

मोठी रक्कम गुंतवल्याने फसवणूक

advertisement
फसवणूक करणाऱ्या ठगांनी महिलेला एका मोठ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडले, ज्यात १८०० सदस्य असल्याचे भासवले जात होते. या ग्रुपवर इतर सदस्यांना टास्क दिले जात होते आणि ते पूर्ण केल्यावर नफ्याची रक्कम दिसत होती. अधिक नफा मिळेल या आशेने महिलेने टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम (सुमारे ४९ लाख रुपये) ठगांच्या खात्यात जमा केली.
पीडितेचा विश्वास बसावा यासाठी आरोपींनी तिला एक फॉर्मही पाठवला, ज्यावर तिची जमा झालेली नफ्याची रक्कम दिसत होती. जेव्हा महिलेने ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना यश आले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधला. तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, 'तुम्हाला ती रक्कम मिळणार नाही.' यामुळे महिलेला मोठा धक्का बसला आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
टेलिग्रामवर एक मेसेज आला अन् घात झाला, मुंबईच्या महिलेनं गमावले 49 लाख
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement