advertisement

Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला डोंबिवलीच्या विद्यार्थ्याचा बळी, बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; लोकलमधून पडून मृत्यू

Last Updated:

या घटनेनंतर लोकलमधील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

News18
News18
ठाणे :  बारावीच्या पहिल्याच पेपरसाठी निघालेल्या डोंबिवलीतील सोहम कटरे (वय १८) या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन सोहम खाली पडला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.   या घटनेनंतर लोकलमधील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सोहम कटरे हा डोंबिवली पूर्व येथील रहिवासी असून तो बारावीच्या परीक्षेला बसला होता. मंगळवारी त्याचा पहिलाच पेपर असल्याने तो सकाळी लवकर घरातून निघाला होता. त्याचे परीक्षा केंद्र कळव्यातील मनिषा विद्यालयात होते. नेहमीप्रमाणे मध्य रेल्वेच्या लोकलने प्रवास करत असताना कळवा–मुंब्रा स्थानकांदरम्यान लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. या गर्दीत दरवाजाजवळ उभा असलेला सोहम अचानक तोल जाऊन खाली पडला.
advertisement
पहिल्याच पेपरच्या दिवशी काळाचा  घाला
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह तातडीने रुग्णालयात हलवण्यात आला.  मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.   सोहमच्या अकाली निधनामुळे डोंबिवलीसह कळवा परिसरात शोककळा पसरली आहे. अभ्यासू, शांत स्वभावाचा आणि सर्वांचा लाडका विद्यार्थी म्हणून सोहमची ओळख होती. पहिल्याच पेपरच्या दिवशी त्याच्यावर काळाचा असा घाला पडावा, यामुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार शोकसागरात बुडाला आहे.
advertisement

लोकल ट्रेनचा प्रवास आता जीवघेणा

या दुर्दैवी घटनेमुळे मुंबई उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि प्रचंड गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दररोज लाखो प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याची कटू वास्तविकता या घटनेने अधोरेखित झाली आहे. लोकल ट्रेनचा प्रवास आता जीवघेणा ठरू लागला आहे. प्रवाशांना लोकल ट्रेनमध्ये जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गर्दीच्या वेळेत प्रवाशांना लोकलमध्ये दोन्ही पाय व्यवस्थित ठेवण्यासाठी जागा नसते. याच गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून प्रवाशांच्या मृत्यूच्या घटना वाढू लागल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला डोंबिवलीच्या विद्यार्थ्याचा बळी, बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; लोकलमधून पडून मृत्यू
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement