mega block : मुंबईकरांनो, लक्ष द्या!, उद्या मध्य-हार्बरवर ब्लॉक; असं असेल उद्याचं वेळापत्रक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Piyush Patil
Last Updated:
उद्या 7 जुलै रोजीही मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे काही लोकल रद्द, काही विलंबाने धावणार आहेत. नेमकं कसं असेल उद्याचं वेळापत्रक ते जाणून घेऊयात.
पियूष पाटील, प्रतिनिधी
मुंबई : रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी विविध कामांच्या निमित्ताने मेगा ब्लॉक असतो. त्यामुळेही उद्याचा दिवसही मुंबईकरांसाठी महत्त्वाचा आहे. उद्या 7 जुलै रोजीही मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे काही लोकल रद्द, काही विलंबाने धावणार आहेत. नेमकं कसं असेल उद्याचं वेळापत्रक ते जाणून घेऊयात.
advertisement
मध्य रेल्वेने रविवारी ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशीदरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड ते विरारदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉक वेळेत रेल्वेरूळांसह सिग्नल व्यवस्थेची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
advertisement
असा असेल ब्लॉक -
मध्य रेल्वे -
स्थानक - ठाणे ते दिवा
मार्ग - पाचवा आणि सहावा
वेळ - सकाळी 10.50 ते दुपारी 3.20
बदल - ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे जलद आणि धीम्या मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून, 18 अप-डाउन मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत.
advertisement
हार्बर रेल्वे -
स्थानक - कुर्ला ते वाशी
मार्ग- अप आणि डाऊन
वेळ - सकाळी 11.10 ते दुपारी 4.10
बदल- सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.
advertisement
पश्चिम रेल्वे -
स्थानक - वसई रोड ते विरार
मार्ग - अप आणि डाऊन धीमा
वेळ - शनिवारी मध्यरात्रीनंतर 12.15 ते रविवारी पहाटे 4.15
बदल - ब्लॉक वेळेत रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. धीम्या मार्गावरील काही लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 06, 2024 11:22 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
mega block : मुंबईकरांनो, लक्ष द्या!, उद्या मध्य-हार्बरवर ब्लॉक; असं असेल उद्याचं वेळापत्रक