rain in maharashtra : मराठवाड्यासह विदर्भात धो-धो बरसणार, राज्यातील 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान खात्यानं काय म्हटलं?

Last Updated:

राज्यातील पावसाची परिस्थिती काय असेल, याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला आढावा जाणून घेऊयात.

+
महाराष्ट्र

महाराष्ट्र हवामान विभाग

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्यातील पावसाची परिस्थिती काय असेल, याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला आढावा जाणून घेऊयात.
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत उद्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबईत उद्या कमाल 35°C तर किमान 27°C तापमान असेल.
advertisement
पुणे शहरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात उद्या दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून सायंकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात उद्या कमाल 31°C तर किमान 22°C इतकं तापमान असेल.
advertisement
मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता -
advertisement
मराठवाड्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. काही ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस झाला. दरम्यान, पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यात या आठवड्यात पाऊस सरासरीहून अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. छ. संभाजीनगर या ठिकाणी उद्या कमाल 35°C तर किमान 22°C तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट -
विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये उद्या कमाल 32°C तर किमान 21°C इतकं तापमान असेल. त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात येतं आहे. चार दिवसाच्या प्रतिक्षेनंतर जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवली गेली आहे . यामुळे पेरणी केलेल्या पिकांना दिलासा मिळणार आहे. समाधानकारक पाऊस पडत असल्याने नागरिकांसह बळीराजा सुखावला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
rain in maharashtra : मराठवाड्यासह विदर्भात धो-धो बरसणार, राज्यातील 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान खात्यानं काय म्हटलं?
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement