advertisement

Thane : सूडाचं असं रूप कधीच पाहिलं नसेल; तरुणासोबत...; माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य

Last Updated:

Thane Crime : जुन्या वादाचे ठाण्यात एक भयंकर प्रकरण पुढे आले आहे. नक्की काय घडलं आणि पोलिसांच्या तपासात नक्की काय समोर आले ते एकदा जाणून घ्याय

News18
News18
ठाणे : पूर्वी झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणावर दगडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या घटनेप्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
हृदय पिळवटून टाकणारा प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील इंदिरानगरमध्ये राहत असलेल्या फिरोज खान (वय30) याच्यावर हा हल्ला झालेला आहे. सर्व गुन्हाची घटना 5 मार्चच्या रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. पीडीत तरुण फिरोज खान आणि आरोपी या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्या वादातून आरोपी प्रथम रेडीज आणि त्याच्या दुसऱ्या साथीदाराने फिरोजच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली. ज्यात फिरोज गंभीर जखमी झाला.
advertisement
भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यानंतर स्थानिकांनी फिरोजला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखले. सध्या फिरोजवप उपचार सुरु असून फिरोजचा लहान भावाने लगेच जाऊन श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane : सूडाचं असं रूप कधीच पाहिलं नसेल; तरुणासोबत...; माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement