advertisement

Suryakumar Yadav : वर्ल्ड कप जिंकला आता सूर्याने दिली आणखी एक गुड न्यूज! लवकर खांद्यावर मोठी जबाबदारी

Last Updated:

Suryakumar Yadav Devika Shetty Baby shower : सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी लवकरच आई-बाबा होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून देविशाच्या प्रेग्नन्सीबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू होती.

Suryakumar Yadav Devika Shetty Baby shower
Suryakumar Yadav Devika Shetty Baby shower
Suryakumar Yadav Gives Good News : भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या यशाच्या शिखरावर आहे. नुकताच आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्याने आता आणखी एक गुड न्यूज दिलीये. कालच सूर्याच्या आंतरराष्ट्रीय करियरला पाच वर्ष पूर्ण झाले असून त्याचा व्हिडीओ देखील त्याने शेअर केला होता. अशातच आता सूर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून सूर्याने आता आपल्या चाहत्यांना वैयक्तिक आयुष्यातील एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे.

सूर्यकुमार यादव बाबा होणार!

सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी लवकरच आई-बाबा होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून देविशाच्या प्रेग्नन्सीबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू होती, मात्र आता एका खास व्हिडिओमुळे या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. सोशल मीडियावर देविशा शेट्टीच्या 'बेबी शॉवर'चा (डोहाळे जेवण) एक गोड व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्या आणि देविशा एका हॉलमध्ये प्रवेश करताना दिसत असून देविशाचा 'बेबी बंप' स्पष्टपणे दिसून येत आहे. हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांकडून या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement

लवकरच खांद्यावर पितृत्वाची जबाबदारी

सूर्यकुमार यादवने केवळ मैदानावरच नाही, तर नेतृत्वातही आपली चमक दाखवली आहे. महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्यानंतर टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावणारा तो तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शिस्तबद्ध खेळ करत जगावर आपले वर्चस्व गाजवले. आता मैदानातील या मोठ्या यशानंतर सूर्याच्या वैयक्तिक आयुष्यातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तो लवकरच पितृत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज आहे.
advertisement

घरात लवकरच चिमुकल्याचे आगमन

दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या घरात लवकरच चिमुकल्याचे आगमन होणार आहे. काल सूर्यकुमार यादव, कोच गौतम गंभीर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दिसले होते. त्यानंतर सीएनबीसी आणि टीव्ही 18 च्या कार्यक्रमात देखील दोघांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना सूर्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक केलं. त्यावेळी सूर्यकुमार यादवचा सत्कार देखील करण्यात आला होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : वर्ल्ड कप जिंकला आता सूर्याने दिली आणखी एक गुड न्यूज! लवकर खांद्यावर मोठी जबाबदारी
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement