Ro Ro Ferry : समुद्रातून कोकण गाठणं झालं सोपं, मुंबई-विजयदुर्ग 'रो-रो' फेरीचा मुहूर्त ठरला; जाणून घ्या
Last Updated:
Ro-Ro Service Update : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता रो-रो सेवा लवकरच सुरु होणार आहे. जाणून घ्या कधी पासून प्रवास करता येणार आहे.
मुंबई : मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास अवघ्या पाच तासांत पूर्ण व्हावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ यांनी प्रवाशांसाठी एक नवीन सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही सेवा नेमकी कशी असेल आणि प्रवाशांना नक्कीच कशा प्रकारे याचा फायदा होऊन याबाबत जाणून घ्या.
उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणं सोपं होणार?
रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते आणि ऑगस्ट 2025 पर्यंत सेवा सुरू करण्याचा आराखडा होता. विशेषतहा गणेशोत्सवापूर्वी ही सेवा सुरू होईल अशी घोषणा करण्यात आली होती.
मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही योजना वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे गणेशोत्सवानंतरही प्रवाशांना या सेवेची प्रतीक्षा करावी लागली. सध्या मुंबई ते सिंधुदुर्ग असा रस्त्याने प्रवास करताना वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि वेळेचा मोठा अपव्यय होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याचमुळे जलमार्ग हा जलद आणि सोयीस्कर पर्याय म्हणून पुढे आणण्यात आला आहे.
advertisement
नेमकी कधी होणार सेवा सुरु?
आता सागरी मंडळाने या सेवेबाबत पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यांसाठी सेवा चालविण्यासाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून मार्चअखेर प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास एप्रिलमध्ये ही बहुप्रतीक्षित रो-रो सेवा प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 7:54 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ro Ro Ferry : समुद्रातून कोकण गाठणं झालं सोपं, मुंबई-विजयदुर्ग 'रो-रो' फेरीचा मुहूर्त ठरला; जाणून घ्या









