Mumbai Water Cut Alert : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! तब्बल 30 तास पाणीपुरवठा बंद; नेमकं कोणत्या भागात पाणीबाणी?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मुंबई महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद आहे.
मुंबई : राज्यात थंडी कमी होऊन उकाडा वाढत आहे. मात्र उन्हाळा सुरु होण्यापूर्वी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे. मुंबईत १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी काही भागांत पाणी पुरवठा ठप्प होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी विविध जलकामे हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. मुंबई महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद आहे.
एम पूर्व व एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत गुरुवार (१२ फेब्रुवारी) मध्यरात्री २ वाजल्यापासून शुक्रवारी ( १३ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजेपर्यंत अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कार्यवाहीदरम्यान एम पूर्व विभागातील काही भागांतील (प्रभाग क्रमांक १४६, १४७ व १४८) तसेच एम पश्चिम विभागातील काही भागांतील (प्रभाग क्रमांक १५४ व १५५) पाणीपुरवठा एकूण ३० तासांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.
advertisement
कोणत्या भागांत पाणीपुरवठा बंद
एम पूर्व व एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी तुर्भे निम्नस्तरीय जलाशय येथे १२०० मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीवर १२०० मिलिमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्यात येणार आहे. तसेच, तुर्भे निम्नस्तरीय जलाशयास पाणीपुरवठा होणाऱ्या १२०० मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीचे टनेल शाफ्टला (AMT-II) जोडणाऱ्या १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलजोडणीची कार्यवाही केली जाणार आहे. यामुळे एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
advertisement
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ३ दिवस पाणी उकळून-गाळून प्यावे. महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर
advertisement
एम पूर्व विभाग
- एच. पी. सी. एल. रिफायनरी, एच. पी. सी. एल. वसाहत, वरुण बेव्हरेजेस, बी. ए. आर. सी., गव्हाणपाडा, इंडियन ऑईल कंपनी लिमिटेड, बी. पी. सी. एल. वसाहत, टाटा वसाहत, नित्यानंद बाग, राणे चाळ (नियमित पाणीपुरवठा २४ तास) (दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री २ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद)
- आर. सी. एफ. कॉलनी (नियमित पाणीपुरवठा २४ तास) (दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री २ ते १३ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद)
- जुनी रिफायनरी क्षेत्र, भारत नगर, जे. प्लॉट, हशू अडवाणी नगर, आणिक गाव, एम. ए. सी. बी. वसाहत, सह्याद्रीनगर, आर. एन. ए. उद्यान, म्हाडा वसाहती, रॉकलाईन इमारती, विष्णू नगर, व्हिडिओकॉन इमारती, एस. जी. केमिकल इमारती, प्रयागनगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६ ते दुपारी २.३० वा.) (दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री २ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद)
- ओम-गणेश नगर, राहुल नगर, अशोक नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता) (दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री २ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद)
advertisement
एम पश्चिम विभाग
बीपीटी, टाटा, बी. पी. सी. एल., माहुल गाव, मरवली चर्च, माहुल एसआरए, फारुख गल्ली, खडी मशीन, आर. सी. मार्ग, सिंधी सोसायटी, एसआरए इमारती, वाशी नाका, अंबा पाडा, जिजामाता नगर, वित्तसंचयन, साईलीला रामटेकडी, तोलाराम टॉवर, चेंबूर कॅम्प, गणेश नगर, अशोक नगर, कोकण नगर, वाशीगाव, म्हाडा इमारती, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्मी नगर, मितुल एन्कलेव, म्हैसूर कॉलनी, एम. एस. इमारती, विजय नगर, आर. सी. मार्ग (नियमित पाणीपुरवठा २४ तास) (दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी २ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 8:42 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut Alert : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! तब्बल 30 तास पाणीपुरवठा बंद; नेमकं कोणत्या भागात पाणीबाणी?










