Mumbai Water Cut: मुसळधार पाऊस, तरीही मुंबईत पाणीसंकट, 2 दिवस पाण्याचा थेंबही येणार नाही, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Water Cut: एकीकडे जोरदार पाऊस सुरू असतानाच मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. अंधेरी (पश्चिम) सह काही भागात 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहील.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत धो धो पाऊस सुरू आहे. परंतु, मुंबईकरांना पुढील काही दिवस पाण्याचा वापर जपूनच करावा लागणार आहे. गुरुवारपासून 2 दिवस म्हणजे 19 आणि 20 जून रोजी काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अंधेरी पश्चिम आणि वेसावे परिसरात पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
अंधेरी (पश्चिम) येथील गोपाळकृष्ण गोखले पुलाखालील वांद्रे गुडे जलवाहिनीवरील 1350 मिलीमीटर व्यासाची प्रवाह नियंत्रण झडप (फ्लो कंट्रोल वॉल्व्ह) दुरुस्ती करण्यात येणार असून वेसावे जलवाहिनीवरील 900 मिलीमीटर व्यासाची फुलपाखरू झडप बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. गुरुवारी, 19 जून दुपारी 2 वाजलेपासून शुक्रवारी, 20 जून रोजी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत असे 11 तास हे काम करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी संपूर्ण जलवाहिनी बंद करावी लागणार आहे.
advertisement
के. पश्चिम विभागातील काही भागाचाही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद
विलेपार्ले पश्चिम : लल्लभाई उद्यान, लोहिया नगर, मीलन भुयारी मार्ग (सबवे), पार्ले गावठाण, जुहू विलेपार्ले विकास योजना (जे. व्ही. पी. डी. स्कीम), जुहू गावठाण क्रमांक 03, व्ही. एम. मार्ग, विलेपार्ले (पश्चिम). या भागातील नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30 अशी असून येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
advertisement
मोरागाव (जे. व्ही. पी. डी.) : मोरागाव, जुह गावठाण क्रमांक 01 आणि 02 या भागात नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30 असून गुरुवारपासून 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहील.
गिलबर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) : जुहू गल्ली, धनगरवाडी, सागर सिटी सोसायटी, अंधेरी (पश्चिम) परिसरात पाणीपुरवठा खंडित राहणार असून या भागातील नियमित पाणीपुरवठ्याची वेळ रात्री 10.00 ते मध्यरात्री 12.30 आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 18, 2025 8:13 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut: मुसळधार पाऊस, तरीही मुंबईत पाणीसंकट, 2 दिवस पाण्याचा थेंबही येणार नाही, कारण काय?