advertisement

लोअर परळ की 'स्लोअर परळ'? मुंबईकरांचे ५ दिवस ट्रॅफिकने गिळले; कुठे आणि कसा जातोय वेळ?

Last Updated:

TomTom Traffic Index 2025 अहवालानुसार मुंबईकरांनी वर्षभरात १२६ तास ट्रॅफिकमध्ये घालवले, लोअर परळ, अंधेरी, BKC भागात वेग फक्त १६.९ किमी, १६ सप्टेंबर सर्वात गर्दीचा दिवस.

News18
News18
मुंबई कधीच थांबत नाही असं म्हटलं जातं, पण मुंबईच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक पाहिलं की हे वाक्य केवळ पुस्तकातच उरल्यासारखं वाटतं. TomTom Traffic Index 2025 चा नवा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्याने प्रत्येक मुंबईकराच्या जखमेवर मीठ चोळले आहे. या अहवालानुसार, मुंबईत ट्रॅफिकमध्ये किंचित सुधारणा झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र एका सामान्य मुंबईकराने वर्षभरात तब्बल १२६ तास म्हणजेच आयुष्यातील ५ पूर्ण दिवस रश अवरमध्ये ट्रॅफिकमध्ये घालवले आहेत.
लोअर परळ की स्लोअर परळ?
या अहवालात कागदावर सुधारणा दिसत असली तरी, दक्षिण मुंबई आणि उपनगरांना जोडणाऱ्या लोअर परळ सारख्या भागात प्रवाशांना ही "सुधारणा" म्हणजे क्रूर थट्टा वाटते. ऑफिस सुटण्याच्या वेळी लोअर परळ, अंधेरी आणि बीकेसी (BKC) मधून बाहेर पडताना ताशी वेग केवळ १६.९ किमी इतकाच मर्यादित राहिला आहे. कोस्टल रोड आणि मेट्रोच्या विस्तारामुळे काही भागात दिलासा मिळाला असला, तरी लोअर परळच्या अरुंद गल्ल्या आणि वाढत्या गाड्यांमुळे हे भाग आजही 'स्लोअर'च राहिले आहेत.
advertisement
पाच दिवसांचा जीवघेणा हिशोब
अहवालातील आकडेवारीनुसार, मुंबईकरांनी वर्षातील १२६ तास केवळ क्लच आणि ब्रेक दाबण्यात घालवले. संध्याकाळी ऑफिसवरून घरी परतताना १० किमीचे अंतर कापायला सरासरी ३५ मिनिटे ३० सेकंद लागतात. विशेष म्हणजे, १६ सप्टेंबर २०२५ हा दिवस मुंबईसाठी वर्षातील सर्वात भयानक दिवस ठरला; ज्या दिवशी रस्त्यांवर १२९% अतिरिक्त गर्दी नोंदवण्यात आली.
advertisement
बेंगळुरू आणि पुण्यापेक्षा आपण 'बरं' आहोत का?
मुंबई जागतिक ट्रॅफिकच्या क्रमवारीत १८ व्या क्रमांकावरून थोडी खाली सरकली आहे, याचा अर्थ सुधारणा होत आहे. या शर्यतीत आपण एकटे नाही; बेंगळुरूमध्ये १० किमीसाठी आजही ३६ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो, तर पुणे देखील ट्रॅफिकच्या विळख्यात मुंबईला टक्कर देत आहे.
सुधारणा की भ्रम?
मेट्रोचे जाळे विस्तारत असले तरी जोपर्यंत मुंबईचा सरासरी वेग २०-२५ किमीच्या वर जात नाही, तोपर्यंत मुंबईकरांचे हे '५ दिवस' वाचणे कठीण आहे. प्रशासनाच्या नजरेत ट्रॅफिक सुटत आहे, पण लोअर परळच्या फ्लायओव्हरवर अडकलेल्या मुंबईकरासाठी 'वेग' आजही एक स्वप्नच आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
लोअर परळ की 'स्लोअर परळ'? मुंबईकरांचे ५ दिवस ट्रॅफिकने गिळले; कुठे आणि कसा जातोय वेळ?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement