नांदेडच्या 4 तरुणांनी मुंबईच्या तरुणीला अडकवलं जाळ्यात, 4 दिवस सुरू होता भयंकर प्रकार, पोलीसही हादरले
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईच्या एका २१ वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. नांदेडमधील रहिवासी असलेल्या चार तरुणांनी तिला जाळ्यात ओढून तिची आर्थिक लूट केली आहे.
मुंबईच्या एका २१ वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. नांदेडमधील रहिवासी असलेल्या चार तरुणांनी तिला जाळ्यात ओढून तिची आर्थिक लूट केली आहे. त्यांनी तरुणीकडून तब्बल ३२ लाख ६९ हजार रुपये उकळले आहेत. आरोपी चार दिवस तिचा मानसिक छळ करत होते. या प्रकरणी पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
नांदेडच्या चार जणांनी मुंबईतील एका २१ वर्षीय तरुणीला 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढून तब्बल ३२ लाख ६९ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. "तुमच्या आजीचं सिमकार्ड दहशतवाद्यांकडं सापडलं आहे," अशी भीती दाखवून आरोपींनी तरुणीला डिजीटल अरेस्ट केलं होतं. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत शनिवारी (२८ मार्च) नांदेडमधून चार संशयित आरोपींना अटक केली आहे.
advertisement
नेमकी घटना काय आहे?
पीडित २१ वर्षीय तरुणीला आरोपींनी फोन करून आपण तपास यंत्रणेतून बोलत असल्याचं भासवलं. "पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अफजल खान याच्याकडे तुमच्या आजीच्या नावाचं सिमकार्ड सापडलं आहे. तुमच्या कुटुंबाकडून गोपनीय माहिती शत्रू राष्ट्राला पुरवली जात आहे," असा गंभीर आरोप तिच्यावर करण्यात आला.
तपास यंत्रणेच्या नावाखाली आरोपींनी या तरुणीला व्हिडिओ कॉलद्वारे सतत नजरेखाली ठेवले. तिला घराबाहेर पडण्यास किंवा कोणाशीही बोलण्यास मज्जाव केला. तरुणीला अटकेची आणि देशद्रोहाच्या गुन्ह्याची भीती दाखवण्यात आली. या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी आणि 'क्लीन चिट' मिळवण्यासाठी आरोपींनी तिच्याकडे मोठ्या रकमेची मागणी केली. घाबरलेल्या तरुणीने आरोपींच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ३२ लाख ६९ हजार रुपये वळवले. सलग चार दिवस हा मानसिक छळ सुरू होता. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत धाव घेतली.
advertisement
मुंबई पोलिसांची नांदेडमध्ये मोठी कारवाई
मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला असता, आरोपींचे धागेदोरे नांदेडमध्ये असल्याचे समोर आले. विशेष पथकाने तातडीने नांदेड गाठून सापळा रचला आणि चार तरुणांना अटक केली. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 11:36 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
नांदेडच्या 4 तरुणांनी मुंबईच्या तरुणीला अडकवलं जाळ्यात, 4 दिवस सुरू होता भयंकर प्रकार, पोलीसही हादरले







