advertisement

CSK vs RR : ' सगळ्यांना भीती वाटतीये...', विक्रम राठोड यांच्यासमोर 28 वर्षांच्या कॅप्टन ऋतुराजची कबुली, काय म्हणाला? Video

Last Updated:

Ruturaj Gaikwad Chat with Vikram Rathour : राजस्थान रॉयल्सचे बॅटिंग कोच विक्रम राठोड आणि चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड यांच्यातील एक मजेशीर संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Ruturaj Gaikwad Chat with Vikram Rathour
Ruturaj Gaikwad Chat with Vikram Rathour
Rajasthan Royals vs Chennai Super Kings : आयपीएल 2026 चा तिसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळाने समान असले तरी आता चेन्नईचं पारडं काहीसं जड दिसतंय. अशातच पहिल्या विजयाने श्रीगणेशा कोण करणार? असा सवाल विचारला जात आहे. अशातच एक व्हिडीओ समोर आलाय. राजस्थान रॉयल्सचे बॅटिंग कोच विक्रम राठोड आणि चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड यांच्यातील एक मजेशीर संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

सगळेच केस का वाढवत आहेत?

प्रॅक्टिस सेशन दरम्यान विक्रम राठोड यांनी टीममधील खेळाडूंच्या वाढलेल्या केसांवरून प्रश्न उपस्थित केला "सगळेच जण केस वाढवत आहेत, काही गेम किंवा चॅलेंज सुरू आहे का?" असा मिश्किल प्रश्न राठोड यांनी विचारला. त्यावर ऋतुराजने उत्तर दिलं. राठोड यांच्या प्रश्नावर ऋतुराज गायकवाडने मजेशीर उत्तर दिलं.
advertisement

केस गळण्याची भीती

"जे प्लेयर्स 28 ते 29 वयोगटाच्या पुढे गेले आहेत, तेच सध्या केस वाढवत आहेत," असं ऋतुराज म्हणाला. वाढत्या वयानुसार केस गळण्याची भीती असल्यानेच अनेकजण सध्या लांब केस ठेवण्याचा ट्रेंड फॉलो करत असल्याचं ऋतुराज गायकवाडने यावेळी सांगितलं.
advertisement
advertisement

राखून ठेवण्याचा प्रयत्न करतोय

"आम्हाला केस जाण्याची (गळण्याची) काळजी वाटतेय, म्हणून आम्ही ते राखून ठेवण्याचा प्रयत्न करतोय.", असं ऋतुराज म्हणाला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या अन् दोघंही आपापल्या मार्गाला लागले. दोघांमधील हा संवाद ऐकून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
advertisement

एम.एस. धोनी आऊट

दरम्यान, स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे एम.एस. धोनी किमान दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर राहणार असल्याने, संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड डावाची सुरुवात करतील आणि संघाच्या नेतृत्वात महत्त्वाची भूमिका बजावतील. धोनी संघासोबत गुवाहाटीला गेला नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत सॅमसन आणि गायकवाड यांच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या असतील.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK vs RR : ' सगळ्यांना भीती वाटतीये...', विक्रम राठोड यांच्यासमोर 28 वर्षांच्या कॅप्टन ऋतुराजची कबुली, काय म्हणाला? Video
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement