PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथविधीतून काय दिला मेसेज?

Last Updated:

PM Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांची एनडीएचं सरकार असणार आहे.

मैं नरेंद्र दामोदरदास मोदी... ; राष्ट्रपती भवनात ऐतिहासिक शपथविधी; मोदींची पंतप्रधानपदी हॅट्रिक!
मैं नरेंद्र दामोदरदास मोदी... ; राष्ट्रपती भवनात ऐतिहासिक शपथविधी; मोदींची पंतप्रधानपदी हॅट्रिक!
राहुल झोरी, प्रतिनिधी
4 जुनला लोकसभा निवडणूकांचे निकाल समोर आले. एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे मोदींना युतीचं सरकार चालवावं लागेल. ही अशी गोष्ट आहे जी मोदींनी आजवर केलेली नाही. त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळापासून 10 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या काळात, पुर्ण बहुमतासह त्यांनी सरकार चालवलं. अशात मोदी हे सरकार चालवू शकतील का? त्यांच्यासमोरील आव्हानं काय असतील याची जोरदार चर्चा होते आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी राष्ट्रपती भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. तेव्हा लोकांच्या मनात सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की युती सरकार चालवण्याचा अनुभव नसलेल्या मोदींना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल ?
advertisement
युतीधर्म
मोदींपुर्वी भाजपचे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयींनी सरकार चालवलंय. त्यांनी 1996, 1998, आणि 1999 या तिन्हीवेळेस पंतप्रधानपदासाठी युती केली. दुसरीकडे मोदींनी गुजरातमध्ये 2001 ते 2014 असं 13 वर्षे मुख्यमंत्री पद सांभाळलं. नंतर ते पंतप्रधान झाले. त्यांनी 2014 ते 2024 चा कार्यकाळही पुर्ण बहुमतासह पुर्ण केला. 2024 ला देखील मोदींना पुर्ण बहुमत मिळेल अशी चर्चा होती. 4 जुनला निकाल जाहिर झाला. मात्र, भाजपसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत. मोदींनी त्याच दिवशी संध्याकाळी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना संबोधित केलं. पंतप्रधानांनी त्यांना सांगितले की ते युतीचं सरकार यशस्वीपणे ते चालवतील. पुर्ण ताकदीने 'युती धर्म' निभावतील. पंतप्रधानांनी युतीचे सरकार चालवणे हे एक आव्हान म्हणून स्वीकारलंय. इतरांच्या शंकांना चुकीचे सिद्ध करण्याचा निर्धार त्यांनी केला. मोदींच्या नवीन मंत्रिमंडळातूनही अनेक बाबी समोर येत आहेत. सातत्य आणि सावधगिरीचे संकेत दिले जातायेत. मोदींसाठी सद्याची परिस्थिती राजकीयदृष्ट्या स्थिर आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी त्यांचे अनेक जुने आणि अनुभवी मंत्री सहकारी कायम ठेवलेत. सर्वकाही नियंत्रणात असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.
advertisement
मोदींनी खेळ पलटवला
मोदी मित्रपक्षांसोबत नवीन परिस्थिती स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. हे करताना त्यांना भाजपमधील कोणत्याही गोंधळाचा धोका पत्करायचा नाहीये. शिवाय मित्र पक्षांची मजरी राखत त्यांना पुढं जावं लागणारंय. यंदा टीडीपीचे 16 आणि जनता दल-युनायटेड 12 खासदार हे किंगमेकर ठरले आहेत. या परिस्थितीचा ते पुर्ण फायदा घेतील यात कसलीच शंका नाही. या दोघांनाही संयुक्त आघाडी सरकार आणि वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील दीर्घ कारभाराचा अनुभव आहे. चंद्राबाबू नायडू हे नेहमीच बुद्धीमान राजकारण्याप्रमाणे राजकारण करत आलेत. ते त्यांच्या राज्यासाठी आणि राजधानी अमरावतीसाठी आर्थिक पॅकेज शोधत आहेत. विशेष बाब अशी की 16 खासदार असूनही त्यांनी फक्त एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्री पदासाठी सहमती दर्शविलीये. नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे 12 खासदार आहेत. तरी नितिश कुमारांचं 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पदावर समाधान करण्यात आलंय. जेडीयूने निकालानंतर पंतप्रधान पदाच्या मागणीपर्यंत मजल मारली होती. नितिश कुमार काही बोलो न बोलो त्यांचे निकटवर्यीत नेते ही मागणी करत होते. चंद्राबाबू मोदींना खिडींत गाठवण्याचे प्रयत्न करत होते.
advertisement
एनडीएला प्राधान्य
आघाडी सरकारमध्ये सभापती हे महत्त्वाचे स्थान असते. एका ज्येष्ठ पत्रकाराने त्याचा सारांश सांगितल्याप्रमाणे, "जिस्का स्पीकर, उसकी सरकार (ज्या पक्षाला सभापतीपद मिळते, सरकारचे भवितव्य त्याच्या हातात असते)." बहुमत नसलेल्या सत्ताधारी पक्षाला बहुमत मिळवण्यासाठी छोटे पक्ष फोडणे मोहक ठरेल. पी व्ही नरसिंह राव ज्यांनी 1991 मध्ये 240 जागा जिंकल्या होत्या त्यांनी दोन वर्षांनंतर लहान पक्षांचे विभाजन करून बहुमत मिळवले. या क्षणासाठी, जेडी(यू) ला देखील दिल्ली आणि पटण्यात आपला फायदा एकत्र करायचा आहे. पुढच्या वर्षी बिहार विधानसभा निवडणुकीत पुनरुत्थान झालेल्या राष्ट्रीय जनता दलाचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचंय. गेल्या काही दिवसांत, पंतप्रधानांनी गियर बदलल्याचे दिसते. हे सरकार मोदी किंवा भाजपचे सरकार नसून एनडीएचे सरकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तेव्हापासून एनडीएला प्राधान्य दिलं जातंय. राजनाथ सिंह यांनी एनडीए संसदीय पक्षाचे नेते (आणि म्हणून पंतप्रधान-नियुक्त), भाजप संसदीय पक्ष आणि लोकसभेचे नेते म्हणून मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला.आणि अमित शहा आणि नितीन गडकरी यांनी त्याला पाठिंबा दिला. पूर्वी भाजपच्या संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड एनडीएच्या नेत्याच्या निवडणुकीपूर्वी होत होती.
मराठी बातम्या/मुंबई/
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथविधीतून काय दिला मेसेज?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement