Sharad Pawar : ‘हा भटकता आत्मा तुम्हाला...’ मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा शरद पवारांनी घेतला समाचार म्हणाले..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Sharad Pawar : लोकसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटकती आत्मा म्हणून शरद पवार यांचा उल्लेख केला होता. या वक्तव्याचा आता खुद्ध शरद पवार यांनी समाचार घेतला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापनदिन अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी भाजपसह सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्याचवेळी पक्षाची आगामी भूमिका काय असेल? यावरही भाष्य केलं.
काय म्हणाले शरद पवार?
हे मोदी सरकार नाही. तर आता हे युतीचं सरकार असणार आहे. आणि हे काम तुम्ही लोकांनी केलं आहे. यापुढे तरुणांना पुढे आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. पंतप्रधान हे कुठल्या एका पक्षाचे नसतात. देशाच्या पंतप्रधान मोदी यांनी सर्व घटकांचा विचार केला पाहिजे. मात्र, हे मोदी विसरले. विसरले म्हणण्यापेक्षा त्यांची ती विचारधारा आहे. त्यामुळे ते तसे वागत आहेत. मुस्लीम समाज हा देशातील महत्त्वाचा घटक आहे. परंतु, मोदी यांनी आपल्या भाषणातून मुस्लीम समाजावर टीका केली. भाषणात मोदी काय म्हणाले या देशामध्ये ज्यांच्या घरात मुलं जास्त जन्माला येतात, म्हणजे त्यांना मुस्लीम समाजाविषयी बोलायचं होतं.
advertisement
हा भटकता आत्मा सोडणार नाही : शरद पवार
हे पुढे काय सांगतात की आघाडीची सत्ता आली तर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून नेणार, तुमच्याकडे दोन म्हैस असतील तर एक काढून घेणार? पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीला हे बोलणं शोभतं का? असा प्रश्न शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला. माझ्यावरही त्यांनी टीका केली. मला ते भटकती आत्मा म्हणाले. एका दृष्टीने त्यांनी चांगलं केलं. कारण, आत्मा हा कायम असतो. आणि हा कायम राहिलेला आत्मा तुम्हाला सोडणार नाही.
advertisement
वाचा - PM मोदींनी या चौघांवर पुन्हा टाकला विश्वास! एकाचही बदललं नाही मंत्रालय, PHOTOS
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची निर्मिती केली. त्यांनी राज्य केलं, मराठी माणसाचा आत्मविश्वास जागा केला. त्यांच्या बाबतीत हे कसं बोलतात? नकली बापाची शिवसेना? एखाद्या संस्थेला, व्यक्तीला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे बोलणं पंतप्रधानांना शोभतं का? अशी टीका शरद पवार यांनी केला.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
June 10, 2024 10:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Sharad Pawar : ‘हा भटकता आत्मा तुम्हाला...’ मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा शरद पवारांनी घेतला समाचार म्हणाले..