Central Railway: वर्षाअखेर फिरायचा प्लॅन? पुण्यातून थेट प्रयागराजला ट्रेन, पाहा वेळापत्रक
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Central Railway: वर्षाअखेरच्या सुट्ट्यांत प्रयागराज दर्शन करता येणार आहे. मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
पुणे : हिवाळी हंगामात उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे ते प्रयागराज दरम्यान दोन एकमार्गी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या विशेष शुल्कावर चालविण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सण-उत्सव आणि सुट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 01411 शनिवारी, दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी पुणे स्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी 29 डिसेंबर रोजी पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी प्रयागराज येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 01499 बुधवारी, 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी पुण्याहून रवाना होऊन 2 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजून 10 मिनिटांनी प्रयागराज येथे दाखल होईल.
advertisement
थांबे कुठं?
या विशेष गाड्यांना हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी आणि फतेहपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक प्रवाशांना या गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.
advertisement
या गाड्यांमध्ये एकूण 20 आयसीएफ डबे असणार असून, त्यात 14 स्लीपर श्रेणीचे आरक्षित डबे, 4 स्लीपर श्रेणीचे अनारक्षित डबे तसेच 2 गार्ड/लगेज व्हॅनचा समावेश आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण 25 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही रेल्वेकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 10:03 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Central Railway: वर्षाअखेर फिरायचा प्लॅन? पुण्यातून थेट प्रयागराजला ट्रेन, पाहा वेळापत्रक










