Pune Traffic: नाताळनिमित्त पुणे गजबजणार! या महत्त्वाच्या भागातील वाहतुकीत 2 दिवस बदल, पर्यायी मार्गाचा करा वापर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
२४ आणि २५ डिसेंबर या दोन दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून या भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा
पुणे: नाताळ सणाच्या उत्साहात पुण्यातील महात्मा गांधी रस्ता (M.G. Road) आणि लष्कर परिसरात भरपूर गर्दी होते. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. २४ आणि २५ डिसेंबर या दोन दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून या भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
वाहतुकीतील प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत:
१५ ऑगस्ट चौक: वाय जंक्शनकडून एम. जी. रोडकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौकात थांबवण्यात येईल. ही वाहने कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळवली जातील.
इस्कॉन मंदिर चौक: इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवरकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील. ही वाहतूक एसबीआय हाऊस चौकातून उजवीकडे वळवून तीन तोफा चौक आणि लष्कर पोलीस ठाण्यामार्गे सोडली जाईल.
advertisement
व्होल्गा चौक: व्होल्गा चौकातून महम्मद रफी चौकाकडे जाण्यास मनाई असेल. वाहनचालकांनी ईस्ट स्ट्रीट रस्त्याने थेट इंदिरा गांधी चौकाकडे जावे.
इंदिरा गांधी चौक: इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ती लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळवण्यात आली आहे.
advertisement
नाताळच्या पार्श्वभूमीवर कॅम्प परिसरातील चर्च आणि बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहनांच्या सुलभ हालचालीसाठी हे बदल करण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 8:49 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: नाताळनिमित्त पुणे गजबजणार! या महत्त्वाच्या भागातील वाहतुकीत 2 दिवस बदल, पर्यायी मार्गाचा करा वापर










