advertisement

या दिवशी साजरा होतो National Cinema Day, फक्त 99 रुपयांत थिएटरमध्ये पाहू शकता कोणतेही चित्रपट 

Last Updated:

National Cinema Day : अनेकांना चित्रपट हा चित्रपट गृहामध्ये जाऊन पाहायला आवडते. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची मजाच काही वेगळी असते. तिथला आवाज तिथले वातावरण सगळेच भारावून टाकणारे असते. मात्र, या तिकिटांची किंमत कधी कधी खूप जास्त असते, जी प्रत्येकालाच परवडेल अशी नसते.

+
प्रतिकात्मक

प्रतिकात्मक फोटो

प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई - अनेकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायची आवड असते. मात्र, अनेकांना ते परवडत नाही. त्यामुळे अनेकजण नेहमी जाणे टाळतात. मात्र, तुम्हाला चित्रपटगृहात चित्रपट पाहणे आवडत असल्यास, आता तुम्ही कोणत्याही चित्रपटाचे तिकीट 99 रुपयांमध्ये मिळवू शकता.
पीव्हीआर असो किंवा सिनेपोलिस, याठिकाणी तुम्ही चित्रपटाचे तिकीट जे 300-400 रुपयांमध्ये घेत होता, ते आता 99 रुपयांमध्ये मिळेल. 20 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जात आहे. त्यासाठी ही सुविधा दिली जाणार आहो. याचबाबत लोकल 18च्या टीमने सविस्तर माहिती जाणून घेतली. 
advertisement
अनेकांना चित्रपट हा चित्रपट गृहामध्ये जाऊन पाहायला आवडते. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची मजाच काही वेगळी असते. तिथला आवाज तिथले वातावरण सगळेच भारावून टाकणारे असते. मात्र, या तिकिटांची किंमत कधी कधी खूप जास्त असते, जी प्रत्येकालाच परवडेल अशी नसते.
रक्तातली साखरेची पातळी चुकूनही वाढणार नाही, फक्त दररोज चघळा ही हिरवी पाने, VIDEO
याच पार्श्वभूमीवर मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट दिन घोषित करते. यावर्षी 20 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन घोषित करण्यात आला आहे. या दिवशी संपूर्ण देशभरात कोणतेही चित्रपट फक्त 99 रुपयात तुम्ही पाहू शकता.  मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI)ने काल बुधवारी 18 सप्टेंबर रोजी एक घोषणा केली आहे.
advertisement
एमएआयने सांगितलं की, 20 सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे 'राष्ट्रीय चित्रपट दिना' साजरा केला जाईल. पीव्हीआर,आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, मूव्ही टाईम आणि डिलाइटसह इतर चित्रपटगृहे या कार्यक्रमासाठी 4,000 हून अधिक स्क्रीनवर चित्रपट दाखवण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे उद्या पीव्हीआर असो किंवा सिनेपोलिस, याठिकाणी तुम्ही चित्रपटाचे तिकीट जे 300-400 रुपयांमध्ये घेत होता, ते आता 99 रुपयांमध्ये मिळेल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
या दिवशी साजरा होतो National Cinema Day, फक्त 99 रुपयांत थिएटरमध्ये पाहू शकता कोणतेही चित्रपट 
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement