Navi Mumbai : थांबा जरा! नवी मुंबई विमानतळावरून प्रवासाचा प्लॅन आहे? तर आधी हे वाचा

Last Updated:

Navi Mumbai Airport Charges : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुल्क समानीकरणाच्या प्रस्तावामुळे मुंबई विमानतळावरील तिकीट दर वाढण्याची शक्यता आहे.

News18
News18
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या 25 डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने विमानसेवा सुरू होणार आहे. या विमानतळासाठी ऑनलाईन तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी मुंबई विमानतळाच्या तुलनेत नवी मुंबईतून प्रवासाचे तिकीट दर जास्त असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही विमानतळांवरील हवाई शुल्कात असलेली तफावत होय.
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई तिकीट दर वाढणार?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नव्याने उभारलेला ग्रीनफील्ड प्रकल्प असून त्यासाठी सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. हा खर्च वसूल करण्यासाठी नवी मुंबई विमानतळावर हवाई शुल्क अधिक ठेवण्यात आले आहे तर दुसरीकडे मुंबई विमानतळ जुना म्हणजेच ब्राउनफील्ड असल्याने तेथील शुल्क तुलनेने कमी आहे. त्यामुळे प्रवासी आणि विमान कंपन्या कमी शुल्क असलेल्या विमानतळाकडे वळण्याची शक्यता निर्माण होते.
advertisement
ही अडचण टाळण्यासाठी अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही विमानतळांना एकत्रित ग्रुप ऑफ एअरपोर्ट्सचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मांडला. दोन्ही विमानतळ एकाच महानगर क्षेत्रात असल्याने हवाई शुल्क समान ठेवावे,असा या प्रस्तावाचा उद्देश आहे. या प्रस्तावाला सिडकोनेही मान्यता दिली असून तो आता राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
advertisement
जर दोन्ही विमानतळांवर समान हवाई शुल्क आकारले गेले तर नवी मुंबईतील तिकीट दर कमी होतील. मात्र त्याच वेळी मुंबई विमानतळावरील विमान प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही विमानतळांवरील तिकीट दर जवळपास समान पातळीवर येतील असे सांगितले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : थांबा जरा! नवी मुंबई विमानतळावरून प्रवासाचा प्लॅन आहे? तर आधी हे वाचा
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement