Chhatrapati Sambhajinagar: बँकेत अधिकारी, पण 'त्या' ऑफरला फसली, आता सगळंच गेलं, पश्चातापाची वेळ
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Online Fraud: छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला बँक अधिकारी पार्टटाईम जॉबला भुलली. आता लाखोंची फसवणूक झाली असून पश्चातापाची वेळ आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : पार्टटाईम काम आणि जादा कमाईचं आमिष दाखवत सायबर भामट्यांनी शहरातील नामांकित बँकेत काम करणाऱ्या तरुण महिला अधिकाऱ्याची तब्बल 26 लाख 73 हजार रुपयांची ऑनलाईन लूट केली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई)च्या नावाचा गैरवापर करत ही फसवणूक 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात एन-11 सुदर्शननगर परिसरात घडली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-11, सुदर्शननगर, टीव्ही सेंटर, हडको भागात राहणाऱ्या दीपाली विजय कोलते (वय 28) या आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून नोकरी करतात. 24 नोव्हेंबरला त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपवरून एनएसईच्या एचआर विभागाच्या नावानं संदेश आला. पुढील संपर्कासाठी टेलिग्राम ॲपवर बोलावण्यात आलं. तिथं ‘रंजिता विजयवर्गिया’ या नावाच्या अकाऊंटवरून पार्टटाईम जॉबची ऑफर देण्यात आली. विश्वास बसावा म्हणून एनएसई ऑफिसचे फोटो, कंपनीचं लेटरहेड आणि माहिती पाठवण्यात आली. पहिल्या दिवशी हॉटेल्सच्या फोटोंना पाच-स्टार रेटिंग देण्याची 20 कामं देण्यात आली. ती कामं पूर्ण करताच थेट बँक खात्यात 200 रुपये जमा झाले. त्यामुळे संशय कमी झाला.
advertisement
दुसऱ्या दिवशीही अशीच कामं देण्यात आली. मात्र तिसऱ्या टास्कला अडचण आली. 800 रुपये भरले तर 30 टक्के कमिशन मिळेल, असं सांगून क्यूआर कोडवर पैसे भरायला लावले. त्यानंतर एनएसईच्या लिंकवरून रजिस्ट्रेशन करून घेतलं. पुढे ‘विकास यादव’ या अकाऊंटवरून गोल्ड खरेदी–विक्रीचं ट्रेडिंग असल्याचं सांगत नवनवीन टास्क दिले गेले. टास्क पूर्ण झाल्यावर ‘अपेक्षा पांडे’ या नावाच्या अकाऊंटवरून सेटलमेंट होईल, असं सांगत आणखी रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आलं.
advertisement
टास्क चुकला, सिस्टम एररचा बहाणा
सुरुवातीला किरकोळ रकमेपासून सुरुवात करून सायबर भामट्यांनी हळूहळू पैशांची मागणी वाढवत नेली. टास्कच्या नावाखाली कधी 1 हजार, कधी 2 हजार, तर कधी थेट 10 हजार आणि 50 हजार रुपये भरण्याचा दबाव टाकण्यात आला. टास्क वेळेत पूर्ण झाला नाही, सिस्टम एरर आली, ग्रुपमधील इतर मेंबरांमुळे व्यवहार अडकला, अशी कारणं सांगत वारंवार पैसे भरण्यास भाग पाडलं गेलं. विश्वास बसावा म्हणून संबंधित महिलेला 88553 या टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून, इतर सदस्यांनीही मोठ्या रकमा भरल्याचं दाखवत सायबर फसवणुकीचा जाळं अधिक घट्ट केलं.
advertisement
वेगवेगळ्या बँक खात्यांतून कोट्यवधींची रक्कम वर्ग
या कालावधीत फिर्यादीने विविध बँकांमधील खात्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले. आयसीआयसीआय, इंडियन बँक, एडीबीआय, अॅक्सिस, पंजाब ग्रामीण, येस बँक आदी खात्यांमध्ये क्यूआर कोड, आरटीजीएस तसेच ऑनलाईन माध्यमातून कोट्यवधी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली. गरज भागवण्यासाठी काही व्यवहारांमध्ये नातेवाईक आणि मित्रांकडून पैसे उधार घेऊनही ही रक्कम पाठवण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.
advertisement
गोल्ड अकाऊंट फ्रीज करून फसवणूक
फिर्यादीला पैसे परत मिळतील अशी अपेक्षा ठेऊन प्रत्येक टास्क पूर्ण केल्यानंतर त्याचे गोल्ड अकाऊंट फ्रीज झाले असल्याचे सांगितले गेले. अकाऊंट अनफ्रीज करण्यासाठी अधिक रक्कम भरावी लागेल असे सांगून शेवटी 12 लाख रुपये भरल्यानंतरही नव्या टास्कच्या नावाखाली पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. या प्रक्रियेनंतर फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे कळाले.
advertisement
26 लाख 73 हजारांची सायबर फसवणूक
view comments24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान सायबर गुन्हेगारांनी फिर्यादीच्या खात्यांमधून एकूण 26 लाख 73 हजार रुपये ऑनलाईन फसवणुकीत काढले. या प्रकरणी फिर्यादीने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवली असून, त्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात सायबर फसवणूक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 14, 2025 1:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar: बँकेत अधिकारी, पण 'त्या' ऑफरला फसली, आता सगळंच गेलं, पश्चातापाची वेळ









