मुलीचं लफडं डोक्यात गेलं, आईनं 'बॉयफ्रेंड'लाच उचललं, गाडीत घातलं अन्..., संभाजीनगरात खळबळ

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाचं अपहरण झाल्याने खळबळ उडाली. मुलीच्या आईनेच तरुणाला भररस्त्यातून उचलून नेलं.

सिडको बसस्थानकात थरार; प्रेमप्रकरणातून तरुणाचे फिल्मीस्टाइल अपहरण<br>‎
सिडको बसस्थानकात थरार; प्रेमप्रकरणातून तरुणाचे फिल्मीस्टाइल अपहरण<br>‎
छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानक परिसरात दिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली. प्रेमसंबंधातून वाद निर्माण झाल्याने एका 23 वर्षीय तरुणाचे भररस्त्यातून फिल्मीस्टाइल अपहरण करण्यात आले. पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या महिलेसह काही अनोळखी व्यक्तींनी तरुणाला जबर मारहाण करत जबरदस्तीने गाडीत कोंबून नेल्याचा प्रकार शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडला. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा एका महिलेला अटक केली आहे.
अपहरण झालेल्या तरुणाचे नाव विशाल आबासाहेब येडके (वय 23, रा. मिसारवाडी) असे असून तो सिडको बसस्थानकासमोरील एका नाष्टा सेंटरवर काम करतो. विशालचे आरोपी महिलेच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
फिर्यादी सुरेश नरवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अचानक पांढऱ्या रंगाची कार नाष्टा सेंटरजवळ आली. त्यातून उतरलेल्या महिलेसह 10 ते 12 जणांनी विशालला मारहाण केली आणि त्याला गाडीत बसवून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
अपहरणानंतर आरोपींनी विशालला कारमधून सातारा परिसरात नेले. प्रवासादरम्यान तसेच तेथे पोहोचल्यानंतर आणखी काही जणांना बोलावून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे विशालने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. मारहाणीनंतर आरोपींनी त्याला सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली सोडून दिले. त्यानंतर विशालने आपल्या मामाला फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. मामा नरवडे यांनी त्याला तात्काळ पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली.
advertisement
या अपहरणामागे जुन्या वादाचा बदला असल्याचे तपासात उघड झाले आहे. सुमारे एक वर्षापूर्वी विशाल आणि संबंधित तरुणी घरातून पळून गेले होते. त्या वेळी मध्यस्थी करून दोघांना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले होते आणि तरुणीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र, या घटनेनंतरही आरोपींच्या मनात राग कायम राहिल्याने सूडाच्या भावनेतून हे अपहरण करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मुलीचं लफडं डोक्यात गेलं, आईनं 'बॉयफ्रेंड'लाच उचललं, गाडीत घातलं अन्..., संभाजीनगरात खळबळ
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement