नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरू, मुंबई एअरपोर्टवरून 23 विमानांचं टेकऑफ
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आज प्रवासी सेवेसाठी खुले झाले. इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर १६ शहरांशी थेट जोडणार. वार्षिक क्षमता २ कोटी प्रवासी.
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी नवी मुंबई: नवी मुंबई मुंबई महानगर क्षेत्राच्या शिरपेचात आज मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आज, २५ डिसेंबरपासून अधिकृतपणे प्रवासी सेवेसाठी खुले झाले आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर या विमानतळावरून पहिल्या प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार असून, यामुळे मुंबईवरील हवाई वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
आज सकाळी ८ वाजता बेंगळुरूहून येणारे इंडिगोचे विमान नवी मुंबईत लँड करणारे पहिले प्रवासी विमान ठरेल. तर, येथून पहिले उड्डाण हैदराबादसाठी होईल. सुरुवातीच्या टप्प्यात इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि आकासा एअर या कंपन्यांमार्फत देशातील १६ प्रमुख शहरांशी थेट संपर्क जोडला जाणार आहे. पहिल्याच दिवशी सुमारे ४ हजार प्रवासी या विमानतळाचा लाभ घेतील असा अंदाज आहे.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. आता प्रत्यक्ष सेवा सुरू होत असताना, सुरुवातीच्या काळात हे विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या कालावधीत कार्यरत राहील. या काळात दररोज २३ नियोजित उड्डाणे सुरू राहतील.
#WATCH | On the eve of the commencement of operations at Navi Mumbai International Airport (NMIA), a spectacular drone show featuring 1,515 drones was organised to mark the airport’s operational launch. The drones moved in seamless coordination, creating striking aerial… pic.twitter.com/MttKW71VU8
— ANI (@ANI) December 24, 2025
advertisement
सध्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता २ कोटी इतकी आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ पासून हे विमानतळ २४ तास सुरू करण्यात येईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही खऱ्या अर्थाने वेग घेईल.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 7:20 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरू, मुंबई एअरपोर्टवरून 23 विमानांचं टेकऑफ










