Navi Mumbai News: नवी मुंबई विमानतळामुळे उरण कॉरिडोरला फायदा, 2 वर्षांत दुप्पटीने प्रवाशांची वाढ; किती फायदा झाला?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मध्य रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या नेरूळ, बेलापूर सीबीडी आणि उरण कॉरिडॉर रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या नेरूळ, बेलापूर सीबीडी आणि उरण कॉरिडॉर रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या अगोदर रेल्वे मार्गावर काही मोजकेच प्रवासी प्रवास करायचे मात्र अलीकडे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हाच आकडा तब्बल २४ लाख इतका पोहोचला आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील नेरूळ, बेलापूर सीबीडी आणि उरण कॉरिडॉर रेल्वे मार्गावर दररोज बहुतांश नोकरदार, चाकरमानी आणि इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने या मार्गावरून प्रवास करत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने 12 जानेवारी 2024 साली, उरण कॉरिडॉर रेल्वे मार्गाचे अनावरण करून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आले होते. उरण येथे असलेल्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रातील कामानिमित्त नेहमीच नेरूळ आणि बेलापूर सीबीडी या रेल्वे स्थानकातून बहुतांश नोकरदार वर्ग आणि चाकरमानी प्रवासी प्रवास करतात सुरू केल्यानंतर काही काळाने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे.
advertisement
मध्य रेल्वे प्रशासनाने 2024 च्या अखेरीस आणि 2025 च्या सुरूवातीला उरण कॉरिडॉर या रेल्वे मार्गावरील लोकल रेल्वे सेवांची संख्या वाढवली होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार उरण- नेरूळ आणि उरण- सीबीडी बेलापूर या रेल्वे मार्गावर यापूर्वी सुमारे 8 ते 10 लाख प्रवासी नियमित प्रवास करायचे. रेल्वे मार्गावरून नियमित प्रवाशांचा आढावा घेत असताना हाच आकडा या वर्षाच्या सुरुवातीला 24 लाखांहून अधिकचा समोर आला आहे. नेरूळ, बेलापूर सीबीडी आणि उरण मार्गावर लोकल रेल्वे सेवा कमी असून निर्धारित वेळेपेक्षा उशिराने प्रवास करत असतात. मध्य रेल्वे प्रशासनाने 2025 मध्ये या रेल्वे मार्गावर 12 लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या होत्या. परंतु अलीकडे वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत या विशिष्ट लोकल रेल्वे सेवा कमी पडत आहेत. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने या स्थितीचा आढावा घेऊन या मार्गावरील नियमित प्रवास करणाऱ्या लोकल रेल्वे सेवांच्या संख्येत वाढ करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
Location :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 7:40 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai News: नवी मुंबई विमानतळामुळे उरण कॉरिडोरला फायदा, 2 वर्षांत दुप्पटीने प्रवाशांची वाढ; किती फायदा झाला?









