एका चार्जिंगमध्ये 500 किमी धावणार, मुंबई ते रत्नागिरी, धुळ्यापर्यंत करा नॉनस्टॉप प्रवास

Last Updated:

नवी दिल्ली येथे सध्या सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पोमध्ये ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमिटेडने नव्या पिढीची इलेक्ट्रिक बस लाँच केली. एका चार्जिंगमध्ये ही बस थोडेथोडके नव्हे तर तब्बल 500 किलोमीटर धावणार आहे.

E bus
E bus
मुंबई - नवी दिल्ली येथे सध्या सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पोमध्ये ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमिटेडने नव्या पिढीची इलेक्ट्रिक बस लाँच केली. एका चार्जिंगमध्ये ही बस थोडेथोडके नव्हे तर तब्बल 500 किलोमीटर धावणार आहे. मुंबईतून केवळ पुणे, नाशिक नव्हे तर थेट छत्रपती संभाजीनगर, कोकणातील सावंतवाडीपर्यंत ही बस एका चार्जिंगमध्ये प्रवास करु शकणार आहे.
महाराष्ट्रासाठी याचे महत्त्व अशासाठी की ऑलेक्ट्रा कंपनीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. ई शिवाई आणि शिवनेरी बरोबरच 9 मीटरच्या छोट्या बसेस देखील एसटी महामंडळाला दरमहा टप्प्याटप्याने ऑलेक्ट्राकडून पुरविल्या जात आहेत.
ओलेक्ट्राने नव्याने डिझाईन केलेल्या 12 मीटर ब्लेड बॅटरी प्लॅटफॉर्म आणि नवीन शैलीतील 9 मीटर सिटी आणि ब्लेड बॅटरीने सुसज्ज 12 मीटर कोच बसेस अशी नवी उत्पादने दिल्लीतील प्रदर्शनात सादर केली आहेत. या बसमध्ये असलेल्या ब्लेड बॅटरीमध्ये 30 टक्के अधिक ऊर्जा साठवणूक क्षमता आहे, ज्यामुळे या बसेस एका चार्जिंगवर 500 किलोमीटरपर्यंतचा प्रवास सहज करू शकतात.
advertisement
ही बस तुलनेने हलकी आहे. 5 हजार पेक्षा जास्त चार्ज सायकलचे आयुष्य असणारी ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी आगामी काळात जास्त टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकते. एअर सस्पेंशन, व्हीलचेअर रॅम्प सारख्या सुविधांमुळे या बसेस दिव्यांगस्नेही देखील आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
एका चार्जिंगमध्ये 500 किमी धावणार, मुंबई ते रत्नागिरी, धुळ्यापर्यंत करा नॉनस्टॉप प्रवास
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement