पाणी जपून वापरा! वांद्रे पश्चिम आणि खारमध्ये 14 तास पाणीपुरवठा बंद, पाहा संपूर्ण लिस्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पाली हिल जलाशयाच्या जलवाहिनी दुरुस्तीमुळे १० फेब्रुवारीला H-West विभागातील वांद्रे पश्चिम, खार पश्चिम परिसरात १४ तास पाणीपुरवठा बंद किंवा कमी दाबाने होणार आहे.
वांद्रे पश्चिम येथील पाली हिल जलाशयाच्या ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेने मंगळवारी, १० फेब्रुवारी २०२६ रोजी करण्याचे निश्चित केले आहे. सकाळी १० वाजेपासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत, असे एकूण १४ तास हे काम चालणार आहे. या काळात H-West विभागातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून काही भागात तो कमी दाबाने होईल.
'या' भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल
दुरुस्तीच्या कामामुळे खालील परिसरातील नागरिकांना १४ तास पाण्याचा पुरवठा होणार नाही वांद्रे पश्चिम भागातील हिल मार्ग, पेरी मार्ग, कार्टर मार्ग, पाली गाव, चिंबई गाव, शेर्ली गाव, कांतवाडी, मॅन्युअल गोन्साल्विस मार्ग आणि सेंट अँड्र्यूज मार्ग परिसर या ठिकाणी कोणताही पाणीपुरवठा होणार नाही.
खार पश्चिम: खार दांडा, कोळीवाडा, दांड पाडा, चुईम गावठाण, गझदरबंध झोपडपट्टी आणि १५ ते २० व्या रस्त्याचा परिसर, पाली हिल, युनियन पार्क (रस्ता १ ते ४), हनुमान नगर, नर्गिस दत्त मार्ग, झिगझॅग मार्ग आणि माउंट मेरी कॅथेड्रल परिसर, चॅपल मार्ग, वेरोनिका मार्ग, के. सी. मार्ग, एल. के. मेहता मार्ग आणि बाजार रस्त्याचा काही भाग या ठिकाणी पाणी कपात करण्यात आली आहे.
advertisement
कमी दाबाने पाणीपुरवठा होणारा परिसर
काही भागांत पाणी बंद नसेल, मात्र त्याचा दाब कमी असेल:
ताज लँड्स एन्ड, बी. जे. मार्ग, एच. के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि गणेश झोपडपट्टी.
या भागात मध्यरात्रीनंतर १ ते पहाटे ४:३० या वेळेत पाणीपुरवठा केला जाईल.
१० फेब्रुवारीपूर्वीच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा. काटकसरीने वापर: दुरुस्तीच्या काळात पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करावा. आरोग्याची काळजी: खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे. महानगरपालिकेच्या या अत्यावश्यक दुरुस्ती कामात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 2:23 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
पाणी जपून वापरा! वांद्रे पश्चिम आणि खारमध्ये 14 तास पाणीपुरवठा बंद, पाहा संपूर्ण लिस्ट








