advertisement

Mumbai Crime : खाकीतल्या माणसानेच खाकीला लुटलं, मुंबईत रेल्वे पोलिसांचा धक्कादायक प्रकार

Last Updated:

Mumbai Shocking News : पोलिसांचे नाव ऐकताच विश्वास आपोआप सर्वांचा बसतो. मात्र मुंबईतील एका घटनेने सर्वांना आश्चर्यचकित करुन सोडले आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका रेल्वे पोलिसानेच दुसऱ्या रेल्वे पोलिसाची तब्बल 92 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
रक्षकच बनला भक्षक
तक्रारदार योगेश अदाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रेल्वे पोलीस रवींद्र दरेकर याने त्यांना परदेशातील गुंतवणुकीतून मोठा नफा मिळाल्याचे सांगितले. हाँगकाँगमधील गुंतवणुकीतून 550 कोटी रुपये मिळाले असून रिझर्व्ह बँकेच्या नियमांमुळे ती रक्कम अडकली असल्याचे त्याने सांगितले. ही रक्कम भारतात आणण्यासाठी कर आणि इतर शुल्क भरणे आवश्यक असल्याचे कारण देत त्याने अदाटे यांच्याकडून पैसे मागितले.
advertisement
'या' गोष्टीने आला संशय
दुप्पट रक्कम परत मिळेल या विश्वासावर अदाटे यांनी जवळपास दीड वर्ष टप्प्याटप्प्याने एकूण 92.50 लाख रुपये आरोपीला दिले. मात्र, ठरल्याप्रमाणे पैसे परत न मिळाल्याने त्यांना संशय आला. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी रवींद्र दरेकर याच्यासह तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून दरेकर याला निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : खाकीतल्या माणसानेच खाकीला लुटलं, मुंबईत रेल्वे पोलिसांचा धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
Grampanchayat Election: गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' तारखांवर ठेवा लक्ष
गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' त
  • राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.

  • गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.

  • येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

View All
advertisement