Railway Special Trains: ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त 138 स्पेशल ट्रेन्स, 650 फेऱ्या; कोणकोणत्या मार्गावर धावणार 'या' ट्रेन्स
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
रेल्वेने देशभरातून ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त 138 अतिरिक्त एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, साऊथ रेल्वेसह वेगवेगळ्या झोन मधून या ट्रेन सोडल्या जाणार आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन वर्षाच्या स्वागताला मोजकेच दिवस शिल्लक राहिलेय. नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत करण्यासाठी नागरिक सध्या चांगलीच तयारी करत आहेत. आता अशातच रेल्वे देखील ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेक नागरिक गोवा, रत्नागिरी सारख्या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करत आहेत. आता त्यांच्यासाठी रेल्वेने देशभरातून ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त 138 अतिरिक्त एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, साऊथ रेल्वेसह वेगवेगळ्या झोन मधून या ट्रेन सोडल्या जाणार आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन अनेक लोकं बाहेर करत असतात. त्यांच्यासाठी रेल्वेकडून काही स्पेशल ट्रेन्स सोडल्या आहेत. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा, यासाठी रेल्वेकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातल्या वेगवेगळ्या नऊ झोन्समधून 138 स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येणार आहे. यामुळे 650 जास्त फेऱ्या होणार आहेत. यामधील 244 फेऱ्यांबाबत माहिती देण्यात आली आहे. या हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस नऊ रेल्वे झोनमधून सोडल्या जाणार आहे. प्रवाशांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
कोणकोणत्या झोनमधून किती ट्रेन्स धावणार?
रेल्वे बोर्डाने एक्सप्रेसच्या धावांना दिलेल्या मान्यतेनुसार, नऊ झोन्समधील प्रत्येक ट्रेनच्या फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेमधून 26 स्पेशल ट्रेन्स धावणार असून एकूण 226 धावा या ट्रेन्सच्या होणार आहेत. मध्य रेल्वेमधून 18 स्पेशल ट्रेन्स धावणार असून 118 फेऱ्या या एक्सप्रेसच्या होणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेकडून 26 ट्रेनला मान्यता मिळाली असून त्या ट्रेन्सच्या एकूण 34 फेऱ्या होणार आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 12 ट्रेन्स सोडणार आहेत. या ट्रेन्सच्या एकूण 82 फेऱ्या होणार आहे. यामधील अनेक ट्रेनची माहिती देण्यात आली आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही संबंधित रेल्वे स्टेशनच्या काऊंटरवर देखील चौकशी करू शकता.
advertisement
दक्षिण पश्चिम रेल्वेमधून 20 स्पेशल ट्रेन्स धावणार असून ट्रेन्सच्या एकूण 42 धावा होणार आहेत. त्यापैकी 28 फेऱ्या सूचित केल्या आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेमधून 14 स्पेशल ट्रेन्स धावणार असून ट्रेन्सच्या एकूण 72 धावा होणार आहेत, त्यापैकी 6 फेऱ्या सूचित केल्या आहेत. उत्तर रेल्वेमधून 18 स्पेशल ट्रेन्स धावणार असून ट्रेन्सच्या एकूण 66 धावा होणार आहेत, त्यापैकी आठ फेऱ्यांना अधिसूचित करण्यात आले आहे. ईशान्य रेल्वेमधून 2 स्पेशल ट्रेन्स धावणार असून ट्रेन्सच्या एकूण 6 धावा होणार आहेत, परंतु अद्याप एकाही फेऱ्यांना अधिसूचित करण्यात आले नाही. ईशान्य सीमा रेल्वेमधून 2 स्पेशल ट्रेन्स धावणार असून ट्रेन्सच्या एकूण 4 धावा होणार आहेत, ज्या सर्व आधीच अधिसूचित करण्यात आल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 12:55 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Railway Special Trains: ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त 138 स्पेशल ट्रेन्स, 650 फेऱ्या; कोणकोणत्या मार्गावर धावणार 'या' ट्रेन्स










