भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण? अखेर नाव ठरलं, 1 जुलैला अधिवेशनात होणार घोषणा?
- Published by:sachin Salve
Last Updated:
महाराष्ट्रात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण विराजमान होणार? अशी चर्चा रंगली होती. पण आता भाजपच्या अधिवेशनाचे निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आहे
तुषार रूपनवर, प्रतिनिधी
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली भाजप प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा आता संपुष्टात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात सुरू असलेले सस्पेन्स संपले असून मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती निश्चित झाली आहे.
महाराष्ट्रात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण विराजमान होणार? अशी चर्चा रंगली होती. पण आता भाजपच्या अधिवेशनाचे निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आहे. या पत्रिकेत १ जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम इथं सायंकाळी ४ वाजता भव्य अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती आहे.
advertisement

भाजपच्या या अधिवेशनात भाजपकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून केंद्र आणि राज्य कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय व प्रदेश परिषद सदस्य, सर्व जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार तसंच माजी व विद्यमान जिल्हा आणि प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता, पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असून, यापुढील राजकीय रणनीतीसाठीही हा कार्यक्रम निर्णायक ठरणार आहे.
advertisement
रवींद्र चव्हाण यांचा संघटनात्मक अनुभव आणि भूमिकेतील कार्यक्षमता लक्षात घेता, हा निर्णय भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 28, 2025 11:28 PM IST