'गोकुळ' दूध संघाची मोठी घोषणा! मुराबरांबरोबर आता मिळणार 'पंढरीपुरी' म्हशी, तर 'या' योजनेचाही होणार विस्तार
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : प्राथमिक दूध संस्थेकडून येणाऱ्या वासाच्या म्हैस दुधाला यापूर्वी प्रति लिटर 3 रुपये आणि गाय दुधाला 2 रुपये दर दिला जात होता. आमच्या काळात...
Kolhapur News : 'गोकुळ' दूध संघाने दूध उत्पादकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये वासाच्या दुधाच्या दरात वाढ करणे, बायोगॅस योजनेचा विस्तार करणे आणि 'पंढरपुरी' म्हशी उपलब्ध करून देणे अशा घोषणांचा समावेश आहे. 'गोकुळ'चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत या घोषणा केल्या.
वासाच्या दुधाला वाढीव दर
अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले की, प्राथमिक दूध संस्थेकडून येणाऱ्या वासाच्या म्हैस दुधाला यापूर्वी प्रति लिटर 3 रुपये आणि गाय दुधाला 2 रुपये दर दिला जात होता. आमच्या काळात 6 आणि 4 रुपये वाढ केलेली होती. वासाच्या दुधाचे संकलन तुलनेने कमी होते, त्यात दूध संस्थांचे नुकसान होते. यासाठी या दूध दरात आणखी वाढ करून म्हैस दुधाला 12 रुपये तर गायीच्या दुधाला ८ रुपये दर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
advertisement
योजनांचा विस्तार आणि नवीन उपक्रम
- बायोगॅस योजना : एनडीडीबी, सिस्टीम बायो आणि 'गोकुळ' यांच्या सहकार्याने राबवलेल्या बायोगॅस योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता 'मागेल त्याला बायोगॅस' देण्याचा मानस आहे.
- नवीन दूध प्रकल्प : 1 ऑक्टोबरपासून स्वतःचा नवीन दही प्रकल्प सुरू केला जाणार आहे. यामुळे बटरचे उत्पादन वाढेल.
- पशुखाद्य : भविष्यात ओल्या आणि वाळलेल्या चाऱ्याचे मिश्रण असलेले 'आयडियल टीएमआर' उत्पादन घेणार आहे.
- पशुवैद्यकीय सुविधा : गडहिंग्लज चिलिंग सेंटरप्रमाणे 'बिद्री' चिलिंग सेंटरमध्येही पशुपालकांना एक्स-रे सुविधा दिली जाणार आहे.
- जातीवंत म्हशी : मुरा जातीच्या म्हशींबरोबरच आता 'पंढरपुरी' म्हशीही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील, अशी घोषणाही करण्यात आली.
advertisement
आमदार सतेज पाटील यांनी नविद मुश्रीफ यांनी संयमाने सभा चालवून विरोधकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली, असे सांगितले. तर शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर येण्याचे आवाहन करण्यात आले होते, पण त्या आल्या नाहीत.
हे ही वाचा : Dahisar Toll Naka: जागा ठरली, दिवाळीपूर्वीच दहिसर टोल नाका शिफ्ट होणार, परिवहन मंत्र्यांनी सांगितलं लोकेशन
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 10, 2025 10:27 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
'गोकुळ' दूध संघाची मोठी घोषणा! मुराबरांबरोबर आता मिळणार 'पंढरीपुरी' म्हशी, तर 'या' योजनेचाही होणार विस्तार










