Dahisar Toll Naka: जागा ठरली, दिवाळीपूर्वीच दहिसर टोल नाका शिफ्ट होणार, परिवहन मंत्र्यांनी सांगितलं लोकेशन

Last Updated:

Dahisar Toll Naka: मीरा-भाईंदर येथील दहिसर टोलनाका दिवाळीपूर्वी स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Mumbai News: अखेर जागा ठरली, दिवाळीपूर्वीच दहिसर टोल नाका शिफ्ट होणार, परिवहन मंत्र्यांनी सांगितलं लोकेशन
Mumbai News: अखेर जागा ठरली, दिवाळीपूर्वीच दहिसर टोल नाका शिफ्ट होणार, परिवहन मंत्र्यांनी सांगितलं लोकेशन
मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्या मूळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यासाठी दहिसर टोल नाका तेथून पुढे 2 किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ दिवाळीपूर्वी स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
मंत्री सरनाईक म्हणाले, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक टोल नाके रद्द केले तसेच सर्व टोल नाक्यावरील लहान वाहनांना टोलमाफी केली. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. दहिसर टोल नाक्यामुळे  मिरा भाईंदर शहरातील 15 लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यामुळे प्रवासाचा वेळ अर्धा ते एक तास वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्यय  होत होता.”
advertisement
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका 2 किलोमीटर अंतावर हलवण्यात येणार आहे. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच केली होती. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला आहे.
advertisement
टोलनाका कधी स्थलांतरित होणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या बाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवेल. प्रस्ताव केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजूर होऊन आल्यानंतर टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी एक ते दीड महिना वेळ लागेल. त्यामुळे या दिवाळीपूर्वी टोलनाका स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मराठी बातम्या/मुंबई/
Dahisar Toll Naka: जागा ठरली, दिवाळीपूर्वीच दहिसर टोल नाका शिफ्ट होणार, परिवहन मंत्र्यांनी सांगितलं लोकेशन
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement