advertisement

Samruddhi Mahamarg: 5 दिवस समृद्धीवर वाहतुकीचा खोळंबा! कोणत्या वेळेत आणि कुठे असेल बंदी? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

Samruddhi Expressway Traffic Block : समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी 27 ते 31 जानेवारीदरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. नेमका हा ब्लॉक कुठे असेल ते पाहुयात.

samruddhi mahamarg
samruddhi mahamarg
मुंबई : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामासाठी वेळोवेळी वाहतूक ब्लॉक घ्यावा लागत असून यामुळे प्रवाशांना काही काळ गैरसोय सहन करावी लागणार आहे.
किती दिवस असणार ब्लॉक
एमएसआरडीसी कडून 27 ते 31 जानेवारीदरम्यान अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एकूण 12 टप्प्यांत वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक महामार्गाच्या 90.500 किमी ते 170.400 किमी दरम्यान असणार आहे. या भागात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचा समावेश आहे.
वाहतूक 45 ते 60 मिनिटे ठप्प पण कधी?
मंगळवार ते शनिवारदरम्यान दुपारच्या वेळेत या मार्गावरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गॅन्ट्री उभारणीदरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
सविस्तर माहिती इथं पाहा
27 जानेवारी रोजी पठाणपूर येथे साखळी क्रमांक 110.400 परिसरात नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 1 या वेळेत तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 3 ते 4 या वेळेत बंद राहणार आहे. तसेच धोत्रा, चांदूर रेल्वे येथील साखळी क्रमांक 125.400 परिसरात नागपूरकडे जाणारी वाहतूकही दुपारी 3 ते 4 या वेळेत तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
advertisement
28 जानेवारी रोजी खंबाळा, चांदूर येथील साखळी क्रमांक 130.400 परिसरात नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी 3 ते 4 या वेळेत तात्पुरती बंद राहणार आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन एमएसआरडीसी कडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Samruddhi Mahamarg: 5 दिवस समृद्धीवर वाहतुकीचा खोळंबा! कोणत्या वेळेत आणि कुठे असेल बंदी? पाहा संपूर्ण वेळापत्रक
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement