'आरक्षणाला पाठिंबा, जरांगेंची मागणी देखील योग्य पण..,' शरद पवार स्पष्टच बोलले

Last Updated:

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. यावर आता शरद पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

News18
News18
रत्नागिरी, चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या आपल्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, मनोज जरांगेंची मागणी देखील योग्य आहे. पण इतरांचाही विचार व्हायला हवा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाबाबत देखील नाराजी व्यक्त केली आहे. लोकांच्या तक्रारीचा विचार करता मुंबई- गोवा महामार्गात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी शरद पवार यांनी केली आहे. आमची सत्ता आली तर कोकणातील हा महामार्ग लोकांच्या अपेक्षेप्रमाणे करू असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 30 तारखेपर्यंत जागा वाटपाबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल असं शरद पवार यांंनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
'आरक्षणाला पाठिंबा, जरांगेंची मागणी देखील योग्य पण..,' शरद पवार स्पष्टच बोलले
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement