SSC Exam 2026: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, पहिला आणि शेवटचा पेपर कधी? पाहा संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
 - Reported by:Namita Suryavanshi
 
Last Updated:
SSC HSC Exam 2026: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी (एसएससी) आणि इयत्ता बारावी (एचएससी) या दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घोषणा असून, आता अंतिम तयारीसाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी उपलब्ध आहे.
दरवर्षीप्रमाणे, फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान या परीक्षा राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांत एकाच वेळी पार पडणार आहेत.
बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा देखील याच कालावधीत पार पडतील.
advertisement
दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून
दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. तर 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होणार आहेत. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही याच काळात घेण्यात येतील.
advertisement
राज्यातील नऊ विभागांत परीक्षा
view commentsया परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहेत. शिक्षण मंडळाने यासंदर्भातील सर्व आवश्यक तयारीला सुरुवात केली असून शाळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 8:48 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
SSC Exam 2026: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, पहिला आणि शेवटचा पेपर कधी? पाहा संपूर्ण माहिती


