Navi Mumbai : नात्यातील विश्वासाला तडा! मामासोबत पत्नीचं चॅटिंग उघड, नवऱ्याला मिळालेल्या अश्लील व्हिडिओनंतर घडलं भयंकर

Last Updated:

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे पत्नीने केलेल्या एका प्रकारानंतर तरुणाने जीवन संपवले आहे.

News18
News18
नवी मुंबई : रबाळे परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या मानसिक छळामुळे एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि तिच्या मामाकडून वारंवार अश्लील व्हिडीओ पाठवून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मामाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
नवी मुंबईतील धक्कादायक प्रकरण
विनोद तुपसौंदर (वय 27) असे मृत तरुणाचे नाव असून तो रबाळे येथील साईनगर परिसरात वास्तव्यास होता. जून महिन्यात विनोदचे लग्न नाशिक येथील वैष्णवी नाटकर (वय 25) हिच्याशी झाले होते. लग्नानंतर काही काळ दोघेही एकत्र राहत होते. मात्र अलीकडच्या दिवसांत त्यांच्यात सतत वाद होऊ लागले होते.
नात्यांना काळिमा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी ही तिच्या मामा संतोष ढगे याच्याशी मोबाईलवरून वारंवार कॉल आणि चॅटिंग करत होती. ही बाब विनोदच्या लक्षात येताच त्यांच्यात वाद वाढले. या वादातून वैष्णवी रागावून माहेरी निघून गेली होती. त्याच दिवशी विनोदच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आल्याचा प्रकार घडला. हे व्हिडीओ संतोष ढगे यानेच पाठवल्याचा संशय विनोदच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
advertisement
या प्रकारामुळे विनोद मानसिकदृष्ट्या प्रचंड तणावाखाली होता. सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून 25 सप्टेंबर रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पत्नी आणि तिच्या मामाकडून होत असलेल्या मानसिक छळामुळेच विनोदने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : नात्यातील विश्वासाला तडा! मामासोबत पत्नीचं चॅटिंग उघड, नवऱ्याला मिळालेल्या अश्लील व्हिडिओनंतर घडलं भयंकर
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement