लग्नापूर्वी स्ट्रगल, पण नंतर जॅकपॉट! 'या' मूलांकाचे जोडीदार बदलतात पार्टनरच नशीब, लिस्टमध्ये तुमचा नंबर आहे का?

Last Updated:

अंकशास्त्रनुसार, प्रत्येक व्यक्तीचा जन्म एका विशिष्ट मूलांकासह होतो. आपल्या जन्मतारखेची बेरीज करून हा मूलांक काढला जातो. अनेकदा काही लोकांच्या आयुष्यात लग्नापूर्वी खूप संघर्ष असतो, मात्र विवाहाचा विधी पार पडताच त्यांचे नशीब पालटते.

News18
News18
Numerology : अंकशास्त्रनुसार, प्रत्येक व्यक्तीचा जन्म एका विशिष्ट मूलांकासह होतो. आपल्या जन्मतारखेची बेरीज करून हा मूलांक काढला जातो. अनेकदा काही लोकांच्या आयुष्यात लग्नापूर्वी खूप संघर्ष असतो, मात्र विवाहाचा विधी पार पडताच त्यांचे नशीब पालटते. याचे कारण म्हणजे त्यांच्या जोडीदाराचा मूलांक त्यांच्या मूलांकाला पूरक ठरतो किंवा लग्नानंतर त्यांच्या स्वतःच्या मूलांकाची सुप्त ऊर्जा जागृत होते.
मूलांक 2 (जन्मतारीख: 2, 11, 20, 29): मूलांक 2 चा स्वामी 'चंद्र' आहे. हे लोक स्वभावाने खूप हळवे आणि संवेदनशील असतात. लग्नापूर्वी हे लोक निर्णय घेताना गोंधळलेले असतात, मात्र लग्नानंतर जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास येतो. विशेषतः लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात मानसिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. जोडीदार त्यांच्या आयुष्यात नशिबाचा 'लकी फॅक्टर' घेऊन येतो.
advertisement
मूलांक 3 (जन्मतारीख: 3, 12, 21, 30): या मूलांकाचा स्वामी 'बृहस्पती' (गुरु) आहे. मूलांक 3 च्या व्यक्ती अत्यंत हुशार असतात, पण अनेकदा त्यांना संधी मिळत नाही. लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात 'बृहस्पती' अधिक प्रबळ होतो, ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती होते. लग्नानंतर या लोकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढते आणि त्यांना मुलांकडूनही खूप सुख मिळते.
advertisement
मूलांक 5 (जन्मतारीख: 5, 14, 23): मूलांक 5 चा स्वामी 'बुध' आहे. हे लोक खूप चंचल आणि साहसी असतात. लग्नापूर्वी त्यांच्या आयुष्यात स्थैर्य नसते. मात्र, लग्नानंतर त्यांच्या बोलण्यातील गोडवा आणि जोडीदाराचे मार्गदर्शन यामुळे ते संपत्तीच्या बाबतीत खूप भाग्यवान ठरतात. लग्नानंतर अनेकदा या लोकांचा परदेश प्रवासाचा योग येतो किंवा त्यांना मोठी मालमत्ता प्राप्त होते.
advertisement
मूलांक 6 (जन्मतारीख: 6, 15, 24): शुक्राचा प्रभाव असलेल्या मूलांक 6 च्या व्यक्ती विलासी जीवन जगणे पसंत करतात. लग्नानंतर या लोकांचे नशीब वेगाने चमकते. शुक्र हा भौतिक सुखांचा कारक आहे, त्यामुळे लग्नानंतर यांना स्वतःचे घर, वाहन आणि सर्व प्रकारचे सुख-सुविधा मिळतात. जोडीदार त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने 'लक्ष्मी' किंवा 'कुबेर' ठरतो.
मूलांक 7 (जन्मतारीख: 7, 16, 25): केतूच्या प्रभावाखाली असलेले मूलांक 7 चे लोक थोडे अंतर्मुख असतात. लग्नानंतर त्यांच्यातील आध्यात्मिक आणि सर्जनशील शक्ती जागृत होते. लग्नानंतर या लोकांचा भाग्योदय होतो आणि त्यांना समाजात मोठे नाव मिळते. जोडीदारामुळे त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि ते यशाच्या शिखरावर पोहोचतात.
advertisement
जोडीदाराच्या अंकांचे महत्त्व: अंकशास्त्रानुसार, जर तुमचा मूलांक आणि तुमच्या जोडीदाराचा मूलांक 'फ्रेंडली' असतील, तर लग्नानंतर दोघांच्या एकत्रित ऊर्जेमुळे घरावर धनाची वर्षा होते. यामुळेच विवाहापूर्वी मूलांक मिलन करणे फायदेशीर मानले जाते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
लग्नापूर्वी स्ट्रगल, पण नंतर जॅकपॉट! 'या' मूलांकाचे जोडीदार बदलतात पार्टनरच नशीब, लिस्टमध्ये तुमचा नंबर आहे का?
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement