रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेने महत्त्वाच्या तीन गाड्यांच्या वेळेत केला बदल
- Published by:News18 Marathi
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने 3 गाड्यांच्या वेळांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत.
मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने 3 गाड्यांच्या वेळांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. 24 ऑगस्टपासून गाड्यांच्या वेळेत बदलाची अंमलबजावणी होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या गाड्यांमध्ये डेक्कन एक्सप्रेस, नागरकोइल एक्सप्रेस आणि तिरुवनंतपुरम एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या वेळेमध्ये 10 मिनिटांचा बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस, नागरकोइल एक्सप्रेस आणि तिरुवनंतपुरम एक्सप्रेस गाड्यांच्या वेळांबाबत हा बदल दिसून येईल. रेल्वेच्या वेळांमधील बदलांची नोंद प्रवाशांनी घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. गाड्यांच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्यामुळे प्रवाशांनो या वेळांकडे लक्ष द्या.
Pustakanch Hotel : आजीचं पुस्तकांचं हॉटेल, नाशिकमधील भिमाबाईंचा सुंदर असा प्रयोग, सर्वत्र होतंय कौतुक, VIDEO
पुणे येथून निघालेली डेक्कन एक्स्प्रेस 25 ऑगस्टपासून मुंबई सीएसएमटी टर्मिनस येथे सायंकाळी 7 वाजून 5 मिनिटांऐवजी 7 वाजून 15 मिनिटांनी येईल. 25 ऑगस्टपासून नागरकोईल एक्स्प्रेस मुंबई सीएसएमटी टर्मिनल्स येथे सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांऐवजी 7 वाजून 5 मिनिटांनी येईल. तसेच तिरुवनंतपूरम एक्स्प्रेस 24 ऑगस्टपासून आठवड्यातून एकदा मुंबई सीएसएमटी टर्मिनल्स येथे 7 वाजून 15 मिनिटांऐवजी 7 वाजून 5 मिनिटांनी येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2024 10:17 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेने महत्त्वाच्या तीन गाड्यांच्या वेळेत केला बदल