Municipal Election : वसई विरारमध्ये बविआ मनसेची युती,उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बोलणी कुठे फिस्कटली?

Last Updated:

वसई विरारमध्ये हिंतेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडी आणि मनसेची युती झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसोबतची हितेंद्र ठाकूर यांची बोलणी कुठे फिस्कटली? हे जाणून घेऊयात.

vasai virar municipal corporation election 2026
vasai virar municipal corporation election 2026
Vasai Virar Municipal Corporation Election News BVA MNS Alliance : वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे महायुतीचा फॉर्म्युला ठरला असताना दुसरीकडे महाविकास आघाडीची होणारी संभाव्य युती फिस्कटल्याचे समोर आले आहे. कारण वसई विरारमध्ये हिंतेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडी आणि मनसेची युती झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसोबतची हितेंद्र ठाकूर यांची बोलणी कुठे फिस्कटली? हे जाणून घेऊयात.
खरं तर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून हितेंद्र ठाकूर आणि महाविकास आघाडी त्यासोबत मनसेची आघाडी करण्याची चर्चा सूरू होती.त्यात वसई विरारमध्ये विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा एकही आमदार निवडुन आला नव्हता. त्यामुळे बविआची ताकद कमी झाली होती आणि भाजप पक्ष शहरात वाढताना दिसत होता. हे पाहता हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीसोबत मिळून एकत्रित लढण्याचा प्रस्ताव होता. पण आता वसई विरारमध्ये बविआ आणि मनसेची युती झाली आहे.त्यामुळे महापालिका निवडणुकीत बविआ आणि मनसे एकत्रितपणे लढताना दिसणार आहे.
advertisement
मनसेच्या या ठिकाणी एकही जागा नाहीत.त्यामुळे पक्ष वाढीसाठी बहुजन विकास आघाडीने बविआसोबत युती करण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.खरं तर या युतीच्या चर्चा होत असताना, एकत्रितपणे लढायचे असेल आणि भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला हटवायचे असेल, तर आमच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल अशी अट हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीसमोर ठेवण्यात आली होती. ही अट कदाचित ठाकरे गटाला मान्य नसल्याने त्यांनी स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तसेच मागच्या वर्षी शिवसेनेच्या 5 जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे जर आपल्या जागा निवडून येत असताना दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर का लढावं?यामुळे ठाकरे गटाने युतीस नकार दिल्याचे समजते.विशेष म्हणजे चिन्हाच्या या अटीबाबत येत्या 2 दिवसात मनसे निर्णय घेणार असल्याचेही बोलले जात आहे.
advertisement
महायुतीचा फॉर्म्युला ठरला
खरं तर गुरूवारी नालासोपारा येथील भाजपा कार्यालयात झालेल्या तीन तासाच्या मॅरेथॉन बैठकीनंतर या जागावाटपावर तोडगा काढण्यात आला होता. त्यानुसार भाजप 91 जागांवर तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आणखी 3 ते 4 जागांच्या वाटपाबाबत बोलणी सूरू आहे. त्यावरच लवकर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
advertisement
वसई विरार महापालिकेचा 2015 चा पक्षनिहाय निकाल
बहुजन विकास आघाडी : 106
भाजपा : 1
काँग्रेस : 0
राष्ट्रवादी काँग्रेस : 0
शिवसेना : 5
इतर/अपक्ष : 3
एकूण 116 जागा
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Municipal Election : वसई विरारमध्ये बविआ मनसेची युती,उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बोलणी कुठे फिस्कटली?
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement