advertisement

समुद्रामार्गे प्रवास करत गाठता येणार समृद्धी महामार्ग, नव्या प्रकल्पाला मान्यता, कसा असेल मार्ग?

Last Updated:

wadhwan to samruddhi mahamarg: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच नव्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. आता वाढवण बंदर थेट समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे.

समुद्रामार्गे प्रवास करत गाठता येणार समृद्धी महामार्ग, नव्या प्रकल्पाला मान्यता, कसा असेल मार्ग?
समुद्रामार्गे प्रवास करत गाठता येणार समृद्धी महामार्ग, नव्या प्रकल्पाला मान्यता, कसा असेल मार्ग?
मुंबई: देशातील सर्वात मोठे बंदर असणारे वाढवण बंदर आता समुद्रमार्गे थेट समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 52 हजार 652 कोटी रुपयांच्या उत्तन विरार सागरी मार्गाला नुकतीच मान्यता दिलीये. त्यामुळे या प्रकल्पाचा विस्तार होणार आहे. याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तयार केलेला सुधारित आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर केला होता.
उत्तन – विरार सागरी मार्ग हा प्रकल्पाच्या विरार कनेक्टरमार्फत वडोदरा – मुंबई एक्स्प्रेस वे सोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मार्ग अधिक जलद आणि कार्यक्षम होणार आहे. हा प्रकल्प भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरेल, असं फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच प्रस्तावित मंजुरीची प्रक्रिया वेगाने करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
advertisement
कसा असेल प्रकल्प?
उत्तन – विरार प्रकल्प एकूण 55.12 किमी लांबीचा आहे. यामध्ये 24.35 किमीचा सागरी मार्ग असेल. तर 30.77 किमी कनेक्टर असेल.
मुंबईतून विरार 45 मिनिटांत
उत्तन - विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी एमएमआरडीए मार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतून - विरारला फक्त 45 मिनिटांत जाता येईल. या महामार्गामुळं पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस.व्ही. रोड आणि लिंक रोडसारख्या मार्गावरील ताण हलका होणार आहे. तसेच, वाहतूक कोंडीदेखील कमी होणार असून वायू आणि ध्वनी प्रदूषणदेखील कमी होईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
समुद्रामार्गे प्रवास करत गाठता येणार समृद्धी महामार्ग, नव्या प्रकल्पाला मान्यता, कसा असेल मार्ग?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement