मुंबईकरांचं रेल्वे स्टॉलवरचं खाणं महागलं; चणे, शेंगदाण्यांना बंदी!

Last Updated:

Western Railway Food: आता रेल्वे तिकीटासाठीच नव्हे तर रेल्वे स्टेशनवर खाण्यासाठी देखील जादा पैसे मोजावे लागतील. पश्चिम रेल्वेने स्टॉलवरील खाद्यपदार्थांच्या किमतीत 25 टक्क्यांची वाढ केलीये.

रेल्वे स्टेशनवरील खाद्यपदार्थ 25 टक्क्यांनी महागले; चणे, शेंगदाण्यांना बंदी, आता तुमच्या खिशाला कात्री!
रेल्वे स्टेशनवरील खाद्यपदार्थ 25 टक्क्यांनी महागले; चणे, शेंगदाण्यांना बंदी, आता तुमच्या खिशाला कात्री!
मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. आता या प्रवाशांना रेल्वेच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ खाणं महागात पडणार आहे. स्टॉलवरील 14 प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 4 वर्षानंतर ही दरवाढ करण्यात आली असून सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर त्याचा भार येणार आहे. दुसरीकडे, ज्वारीपासून बनवलेले आरोग्यदायी पदार्थ विक्रीसाठी ठेवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कसे आहेत सुधारित दर?
पश्चिम रेल्वेने खाद्यपदार्थाचे दर प्रमाणित करण्यासाठी समिती नेमली होती. बाजाराचा अभ्यास करून समितीने खाद्यपदार्थांचे दर निश्चित केले. त्यामुळे कोरोना आणि इतर कारणांमुळे गेली अनेक वर्षे न बदललेले दर आता बदलण्यात आले आहेत. आता स्थानकांवरील स्टॉलवर 10 रुपयांना मिळणार वडा 15 रुपयांना मिळणार आहे. लिंबूपाणी, कोकम, रसना आणि सरबत 200 मिली ऐवजी 150 मिली इतकेच मिळणार आहे.
advertisement
नवीन खाद्यपदार्थ मिळणार
पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आता नवीन खाद्यपदार्थ मिळणार आहेत. यामध्ये दाबेली, व्हेज हॉट डॉग, चीज पनीर रोल, चीज पनीर हॉट डॉग, शेव पुरी, सँडविच, चायनीज भेळ आणि डोनट यांचा समावेश आहे. तर, आरोग्यदायक खाद्य पदार्थांमध्ये ज्वारीपासून बनवलेली चकली, पोहे, बिस्कीट, खाकरा, थेपला यांचा समावेश असणार आहे.
advertisement
निर्णयावर आक्षेप
पश्चिम रेल्वेने काही पेयांच्या किमती एक रुपयाने कमी केल्या आहेत. तसेच, त्यांचे प्रमाणही जास्त प्रमाणात कमी केले आहे. दुसरीकडे ब्रँडेड कंपन्यांमुळे सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरलेले मिल्क शेक, चणे, शेंगदाणे, फरसाण यासारख्या स्वस्त आणि स्थानिक वस्तू बंद करण्यात आल्या आहेत. या निर्णयावर पश्चिम रेल्वे केटरिंग असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
advertisement
खाद्यपदार्थांची दरवाढ
रेल्वे स्थानकांवर चणे-शेंगदाणे, फरसाण, गुलाब / व्हॅनिला आणि चिकू मिल्कशेक, खारे शेंगदाणे आणि आईस्क्रीम डोनट यादीतून वगळण्यात आले आहेत. तर वडा, सामोसा, ढोकळा, साबुदाणा वडा, लाडू, सँडिव्हीज, उसळ, रगडा, फ्रँकी, पॅटिस इ. पदार्थांच्या दरांत वाढ केली आहे. प्रवाशांना स्थानकांवर दर्जेदार अन्न पुरवण्यावर लक्ष केंद्रित करत असून नियमानुसार काही पदार्थांचे दर वाढविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांचं रेल्वे स्टॉलवरचं खाणं महागलं; चणे, शेंगदाण्यांना बंदी!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement