advertisement

वाहतूक कोंडीचं नो टेन्शन! मुंबईत होतोय 8 पदरी कोस्टल रोड, कामाला गती, डेडलाईन ठरली!

Last Updated:

Bandra Versova Sea Link: गेल्या सात वर्षांत या प्रकल्पाचे केवळ 30 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामाला गती आली आहे.

वाहतूक कोंडीचं नो टेन्शन! मुंबईत होतोय 8 पदरी कोस्टल रोड, कामाला गती, डेडलाईन ठरली!
वाहतूक कोंडीचं नो टेन्शन! मुंबईत होतोय 8 पदरी कोस्टल रोड, कामाला गती, डेडलाईन ठरली!
मुंबई: पश्चिम उपनगरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाच्या कामाला पुन्हा गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. गेल्या सात वर्षांत या प्रकल्पाचे केवळ 30 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंत्राटदारांना मनुष्यबळ व यंत्रसामग्री वाढवण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत 17.7 किलोमीटर लांबीचा हा सी लिंक उभारला जात आहे. या मार्गावर एकूण 8 मार्गिका असतील. त्यातील मुख्य सागरी सेतू 9.60 किलोमीटर लांबीचा असून तो समुद्रात सुमारे 900 मीटर आत उभारला जाणार आहे. सध्या समुद्रातील पुलाच्या कामाला वेग देण्यात आला असून एकूण प्रगती 30 टक्क्यांवर पोहोचली आहे.
advertisement
प्रकल्पाचे काम 2019 मध्ये सुरू झाले होते आणि ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र कोरोना टाळेबंदीमुळे काम काही काळ पूर्णपणे ठप्प झाले. त्याचदरम्यान कंत्राटदार रिलायन्स इन्फ्रा आर्थिक अडचणीत सापडल्याने प्रकल्पावर परिणाम झाला. त्यानंतर 2022 मध्ये अपको इन्फ्राटेक आणि वी बिल्ट यांनी काम हाती घेतले. तरीही गेल्या 4 वर्षांत प्रगती मर्यादित राहिली.
advertisement
आता कामातील प्रमुख अडथळे दूर झाले असून प्रशासनाने कामाचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. मागील वर्षी प्रकल्पासाठी 16 बार्जेस कार्यरत होत्या तर यंदा ही संख्या दुप्पट करून 32 करण्यात आली आहे. समुद्रातील कामे मे महिन्याच्या मध्यापर्यंतच शक्य असल्याने त्याआधी जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पावसाळ्यानंतर बार्जेसची संख्या आणखी वाढवून काम जलदगतीने पूर्ण करण्याचा मानस आहे.
advertisement
या प्रकल्पाचा एकूण खर्च 18,120 कोटी रुपये असून सुधारित मुदत मे 2028 अशी निश्चित करण्यात आली आहे. हा सागरी सेतू पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
वाहतूक कोंडीचं नो टेन्शन! मुंबईत होतोय 8 पदरी कोस्टल रोड, कामाला गती, डेडलाईन ठरली!
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement