advertisement

Mumbai News: मुलुंड हादरलं! मेट्रो- 4 चा स्लॅब कोसळला, पण मेट्रो लाईन कुठली? 32 km चा प्रवास 30 स्टेशन; पाहा संपूर्ण Route Map

Last Updated:

मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्याची घटना अचानक घडली. ज्या मेट्रोचा स्लॅब कोसळला, ती मेट्रो कोणती आहे? कोणत्या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे? जाणून घेऊया.

Mumbai Metro Line 2B April 2026 opening date
Mumbai Metro Line 2B April 2026 opening date
मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्याची घटना अचानक घडली. मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेमुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. या घटनेमध्ये एक व्यक्ती मृत असून तिघेजण जखमी झाले आहेत. मुलुंड पश्चिमेतील एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ हा अपघात घडला आहे. उंच मेट्रो ट्रेन पुलाच्या पॅरापेट भिंतीचा काही भाग (अंदाजे 6 बाय 4 आकाराचा) धावत्या ऑटो रिक्षा (MH 04 MP 1434) आणि खाजगी स्कोडा कार (WB 04 AS 1652) वर पडला. ज्या मेट्रोचा स्लॅब कोसळला, ती मेट्रो कोणती आहे? कोणत्या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे? जाणून घेऊया.
मेट्रो लाईन 4 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा- कासारवडवली ही मेट्रो तब्बल 32.32 किमी अंतराची आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 30 मेट्रो स्टेशन्स असतील. मेट्रो लाईन 4 ईस्टर्न एक्सप्रेस रोड, मध्य रेल्वे, मोनो रेल्वे, मेट्रो लाईन 2 बी (डीएन नगर ते मांडले), मेट्रो लाईन 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो लाईन 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) यांना इंटर कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मेट्रो सेवेची ठाणेकरांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. खरंतर, मेट्रो सुरू होण्यापूर्वीच स्लॅब कोसळल्यामुळे सर्वच स्तरातून कामाच्या पातळीची चर्चा होत आहे. सरकारी कार्यालये, अनेक प्रायव्हेट ऑफिसेस अशा प्रमुख गोष्टींना ही मेट्रो जोडणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर सध्या लागत असलेल्या वेळेपेक्षा दुप्पटीने ही वेळ कमी लागणार आहे.
advertisement
मेट्रो लाईन 4 मध्ये एकूण 30 मेट्रो स्थानकांचा समावेश असणार आहे. यामध्ये, भक्ती पार्क, वडाळा टीटी, अनिक बस स्टॉप, सिद्धार्थ कॉलनी, गरोदिया नगर, पंत नगर, लक्ष्मी नगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी, सुर्या नगर, गांधी नगर, नेव्हल हाऊसिंग, भांडूप महापालिका, डोंगरी पाडा, भांडूप, शांघरिला, डॉ. हेगडेवार चौक, मुलुंड फायर स्टेशन, महाराणा प्रताप चौक, ठाणे तीन हात नाका, ठाणे आरटीओ, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजीवाडा, कापुरबावडी, मानपाडा, टिकुजीनीवाडी, विजय गार्डन आणि कासारवडवली असे तीस मेट्रो स्थानक या मेट्रोसाठी असणार आहेत. 2016 मध्ये मेट्रोच्या कामाचं उद्घाटन झाल्यानंतर आता ही मेट्रो केव्हापासून सुरू होणार ? याच्या प्रतिक्षेत सध्या ठाणेकर आहेत. ठाणे आणि वडाळ्याला जोडणारी ही मेट्रो केव्हापासून सुरू होणार याच्या प्रतिक्षेत सध्या ठाणेकर आणि मुंबईकर आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुलुंड हादरलं! मेट्रो- 4 चा स्लॅब कोसळला, पण मेट्रो लाईन कुठली? 32 km चा प्रवास 30 स्टेशन; पाहा संपूर्ण Route Map
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement