advertisement

Mumbai Crime : हसऱ्या चेहऱ्यामागे दडला होता सैतान; महिलेनेच मैत्रिणीविरुद्ध रचला धक्कादायक कट

Last Updated:

Ghatkopar Crime News : अनेकदा आपण सहन एक-दोन ओळखीत झालेल्या व्यक्तींवर विश्वास ठेवतो. मात्र हीच सवय एका महिलेला महागात पडलेली आहे. नेमकं मुंबईतील महिलेसोबत काय घडलं ते एकदा जाणून घ्याय

News18
News18
मुंबई : मुंबई शहरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे एका महिलेने दुसऱ्या महिलेसोबत असा काही प्रकार केलेला आहे, ज्यामुळे थेट पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागली आहे. नेमके काय घडले आणि पोलिस तपासात काय काय समोर आले ते सविस्तर जाणून घेऊयात.
ओळखीचा फायदा घेत करोडोंची लूट
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील भारती भानुशाली या महिलेसोबत हा प्रकार घडलेला आहे जिथे बाजारभावापेक्षा स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष या महिलेला देण्यात आले आणि तिथंच आरोपी महिला तिच्या डावात यशस्वी झाली.
नेमकी दोघींची ओळख कशी झाली?
तक्रारदार भारती भानुशाली या घाटकोपर पश्चिम भागात वास्तव्यास आहेत. दरम्यान 2023 मध्ये त्याची ओखळ त्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेशी झाली. ओळख वाढवून भारतीया आरोपी महिलेला आपण सोने विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले आणि भारती यांनी ही वेळोवेळी तब्बल 2 कोटी 35 लाख रुपये आरोपी महिलेला दिले.
advertisement
महिला एका रात्रीत फरार
संधीचा फायदा घेत आरोपी महिलेने सर्व पैसे घेतले आणि तेथून फरार झाली. काही दिवसानंतर चौकशीसाठी भारती या आरोपी महिलेकडे गेल्या असता आपली फसवणूक झाल्याचा प्रकार तिच्या समोर आला आणि त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : हसऱ्या चेहऱ्यामागे दडला होता सैतान; महिलेनेच मैत्रिणीविरुद्ध रचला धक्कादायक कट
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement