Ganpati Temple : इथे आहे अंजिराच्या झाडापासून बनवलेली गणेशाची 32 फूटाची अनोखी मूर्ती

Last Updated:

32 फूट उंच गणेशाची ही अप्रतिम मूर्ती लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली होती. या मूर्तीबाबत विशेष बाब म्हणजे तिचं विसर्जन केलं गेलं नाही

गणेशाची 32 फूटाची अनोखी मूर्ती
गणेशाची 32 फूटाची अनोखी मूर्ती
मुंबई 07 सप्टेंबर : गणेश चतुर्थी जवळ येऊ लागली की गणेश भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचते. गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तामिळनाडूतील नागापट्टिनम जिल्ह्यात गणपतीची अनोखी मूर्ती साकारण्यात आली होती. ही मूर्ती 32 फूट उंच होती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पवित्र मूर्ती अंजिराच्या झाडापासून बनलेली. 32 फूट उंच गणेशाची ही अप्रतिम मूर्ती लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली होती. या मूर्तीबाबत विशेष बाब म्हणजे तिचं विसर्जन केलं गेलं नाही.
गणपतीची ही मूर्ती बनवणाऱ्या समितीचे अध्यक्ष कुबेंद्रन यांनी सांगितलं की, नागाई विश्वरूप विनायक समितीने 83 अंजिराच्या झाडांनी बनवलेली ही विशाल गणेशमूर्ती विसर्जित केली जाणार नाही. परंतु भगवान गणपती आपल्या भक्तांना सदैव आशीर्वाद देतील. त्यांनी सांगितलं की, ही पवित्र मूर्ती अंजिराच्या झाडावर कोरली गेली आहे आणि गणपतीची ही अप्रतिम प्रतिमा कोरण्याचं मोठे काम मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यातच सुरू झालं होतं.
advertisement
"आम्ही 4 टन वजनाची ही मूर्ती बनवण्यासाठी सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च केले आणि एक मोठा रथ देखील बनवला ज्यावर भगवान बसतील," असं कुबेरन यांनी पीटीआयला सांगितलं. कुबेंद्रन म्हणाले होते, की, "गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे गणेश चतुर्थी उत्सव साजरा केला गेला नाही. त्यामुळे यावेळी मी पवित्र अंजिराच्या झाडापासून गणेशमूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला, जे माझं गेल्या 15 वर्षांपासूनचं स्वप्न होतं." कुबेरनच्या मते, अथी (अंजीर) हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं जातं. कारण हे वृक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भगवान दत्तात्रेयांशी संबंधित आहे. तसंच अंजिराचं झाड देशात सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं.
advertisement
सुमारे 300 किमी अंतरावर असलेल्या नागपट्टीनममध्ये समितीच्या मंजुरीनंतर मूर्ती उभारण्यासाठी निधी जमा करण्यात आला. मग कावेरी डेल्टा जिल्ह्यांतील कच्च्या अंजिराच्या झाडांसह ही सुंदर प्रतिमा तयार करण्यासाठी सुमारे 8 महिने लागले. "आम्ही पिल्लैयारची (गणेशाचे दुसरे नाव) मूर्ती बनवण्यासाठी रात्रंदिवस काम केलं," असं थिरुनावुकारासू म्हणाले.
कुबेरन यांनी दावा केला, की तामिळनाडूतील कांचीपुरम येथील कोझीकुठी गावातील श्री श्रीनिवास पेरुमल मायावरमच्या जवळ कावेरी नदीच्या काठी भगवान विष्णूचा अवतार असलेला अथी वरादार आहे. जो 40 वर्षांतून एकदा भक्तांना दिसतो." श्री श्रीनिवास पेरुमल मंदिराचे प्रमुख देवता 20 फूट उंच आणि अंजीराच्या लाकडापासून बनवलेले आहेत.
मराठी बातम्या/देश/
Ganpati Temple : इथे आहे अंजिराच्या झाडापासून बनवलेली गणेशाची 32 फूटाची अनोखी मूर्ती
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement