म्हशीला पाणी देत असताना पाय घसरला, पतीच्या मृत्यूनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर, पण महिलेच्या जिद्दीला सलाम!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 26 वर्षांपूर्वी माझ्या पतीच्या निधनानंतर मला आणि माझ्या चार लहान मुलांना कोणीही आधार दिला नाही. आमच्या कुटुंबातील सदस्यांनीही आम्हाला सोडून दिले.
मोहित शर्मा, प्रतिनिधी
करौली : पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र, महिलेने जिद्दीने पुन्हा आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू केला आणि आज ही महिला मागील 26 वर्षांपासून आपल्या कुटुंबाचे पालनपोषन करत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात या महिलेची प्रेरणादायी कहाणी.
केसंती बाई असे या महिलेचे नाव आहे. त्या NH – 11b महामार्गाच्या बाजूला आपले चहाचे दुकान चालवत आहेत. तसेच या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांची उपजीविका भागवत आहेत. पोटात 7 महिन्यांचं बाळ असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. मात्र, तरीही त्यांनी परिस्थितीशी लढताना हार मानली नाही आणि चार मुलांसाठी संघर्ष करत संकटांचा सामना केला.
advertisement
केसंती बाई करौली यांनी मागील 3 वर्षांपूर्वी आपल्या चहाचे दुकाने सुरू केले. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 26 वर्षांपूर्वी माझ्या पतीच्या निधनानंतर मला आणि माझ्या चार लहान मुलांना कोणीही आधार दिला नाही. आमच्या कुटुंबातील सदस्यांनीही आम्हाला सोडून दिले. त्यानंतर 25 वर्षांपूर्वी त्यांनी 20 रुपयांवर मजुरीचे काम करून चार मुलांचे पालनपोषण केले आणि मोलमजुरी करूनही जगणे शक्य नसताना त्यांनी वर्षानुवर्षे भाजीचा स्टॉलही चालवला. आता मुलांची लग्ने झाल्यावर केसंतीबाई चहाचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
advertisement
विहिरीत पडल्याने पतीचा मृत्यू -
केसंती बाई यांनी सांगितले की, 26 वर्षांपूर्वी म्हशीला विहिरीतून पाणी पाजताना त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यांचा पती म्हशीसाठी दोरीने विहिरीतून पाणी काढत होता. मात्र, अचानक त्याचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला. पतीच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या पोटात 7 महिन्यांचे बाळ होते. पतीच्या दुःखद मृत्यूनंतर 3 महिन्यांनी तिची सर्वात लहान मुलगी जन्माला आली.
advertisement
पतीच्या निधनानंतर या महिलेच्या आयुष्यात एक दिवस असा प्रसंग आला की ती अचानक आजारी पडली. त्यावेळी ही महिला आणि तिची मुले तीन दिवस उपाशी होती. या महिलेला आपल्या चार मुलांचे संगोपन करण्यासाठी अनेक अडचणी आणि आव्हानांना सामोरे जावे लागले, असे त्यांनी सांगितले.
BSF मधून रिटायर्ड झाल्यावर सुरू केली शाळा, पदकांचा पडतोय पाऊस, लोकं आता म्हणतात बॉक्सिंग फॅक्टरी
दोन वर्षांपासून या महिलेच्या दुकानात चहा प्यायला येणारे हरीसिंह मीना यांनी लोकल 18 ला सांगितले की, ये-जा करणाऱ्यांची तहान भागवण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने डझनभर माठ बसवले आहेत. आम्ही त्यांच्या दुकानात 2 वर्षांपासून चहा पीत आहोत. त्या खूप चांगल्या चहा बनवतात. एकदा इथे जो चहा पितो तो पुन्हा इथे चहा प्यायला येतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Location :
Maharashtra
First Published :
Mar 08, 2024 1:52 PM IST
मराठी बातम्या/देश/
म्हशीला पाणी देत असताना पाय घसरला, पतीच्या मृत्यूनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर, पण महिलेच्या जिद्दीला सलाम!








