Air India Plance Crash : शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या पायलटला ऐन वेळी दगा, अपघाताचं हे ठरणार का कारण? समोर आली महत्त्वाची माहिती
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Air India Plance Crash : एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे काही कारणे समोर आली आहेत.
अहमदाबाद: गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात प्रवासी, केबिन क्रू आणि मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील डॉक्टरांचा मृत्यू झाला. जवळपास 265 जणांचा यात मृत्यू झाला. तर, एक जण बचावला आहे. एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे काही कारणे समोर आली आहेत.
एअर इंडियाच्या AI-171 या विमानाच्या क्रॅशमागे मोठं कारण समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही इंजिनमध्ये प्रोपल्शनसाठी इंधन पुरवठा अपुरा राहिल्याने ही भीषण दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
विशेष म्हणजे, विमानाच्या दोन्ही इंजिनवर अचानक एकाच वेळी जास्त ताण आला आणि अखेर ते दोन्ही इंजिन बंद पडले. यामुळे पायलटला विमानावरचा संपूर्ण ताबा गमवावा लागला आणि विमान अवघ्या काही क्षणांत कोसळले. इंधनाचा अपुरा पुरवठा झाल्याने विमानाचा इंजिनवर दबाब आल्याने इंजिन बंद पडल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
विमानाने ‘नोज डाऊन’ नव्हे, तर फ्लॅट क्रॅश केलं!
मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये स्पष्ट दिसते की, AI-171 विमान ‘नोज डाऊन’ नव्हे तर संपूर्ण फ्लॅट पोझिशनमध्ये खाली कोसळले. हेच या अपघाताच्या गंभीरतेचं संकेत देतं.
इंधन पुरवठ्यातील अडचणीने इंजिनमध्ये बिघाड?
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर इंजिनपर्यंत इंधन नीट पोहोचत नसेल, तर त्याचा थेट परिणाम प्रोपल्शनवर होतो. आणि दोन्ही इंजिन फेल झाल्यास कोणत्याही प्रकारे विमानाचं संतुलन राखणं अशक्यच असतं. याच कारणामुळे AI-171 क्रॅश झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
अपघाताचा तपास सुरू
DGCA आणि एअर इंडिया प्रशासनाकडून या अपघाताचा सखोल तपास सुरू असून, फ्यूल सिस्टीम, इंजिन लॉग्स आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरच्या मदतीने खरी कारणं शोधली जात आहेत.
दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडला आहे. दुसर्या ब्लॅक ब़ॉक्सचा शोध घेतला आहे. ब्लॅक बॉक्समुळे अपघाताचं नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे.
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
June 13, 2025 8:31 AM IST
मराठी बातम्या/देश/
Air India Plance Crash : शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या पायलटला ऐन वेळी दगा, अपघाताचं हे ठरणार का कारण? समोर आली महत्त्वाची माहिती