Independence Day : एकेकाळी क्रांतिकारकांचे केंद्र होती ही जागा, भगतसिंग यांनी याठिकाणी बनवला होता बॉम्ब

Last Updated:

राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग हे भारतमातेचे असे वीर सुपूत्र आहेत, ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिले.

नूरी दरवाजा
नूरी दरवाजा
हरिकांत शर्मा, प्रतिनिधी
आग्रा, 12 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. यामुळे आजही भारत मातेच्या वीर सुपूत्रांची आठवण केली जाते. या वीरांमध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे भगतसिंग. भगतसिंग यांचे आग्रा शहराशी अतूट नाते आहे. आग्रामध्ये एक अशी इमारत आहे ज्यामध्ये भगत सिंग यांनी बॉम्ब बनवले होते. ही इमारत कधी काळी भारतमातेच्या क्रांतीकारकांसाठी एक केंद्रस्थान होते. आज त्याच इमारतीबाबत जाणून घेऊयात.
advertisement
ही जागा मात्र, दुर्लक्षित आहे. माध्यमांच्या ऐवजी कोणीही भगत सिंग यांच्या या जागी नाही जात. याठिकाणी भगत सिंग यांनी आग्र्यात राहून 1 वर्षाचा अज्ञातवास पूर्ण केला होता. ही जागा आहे, आग्र्याचा नूरी दरवाजा, जिथे खोली क्रमांक 1784 च्या हवेलीमध्ये 5 रुपये प्रतिमहिने भाडे देऊन भगतसिंग राहत होते. आज ही इमारत जीर्ण अवस्थेत असून ती कोसळण्याच्या मार्गावर आहे.
advertisement
भगतसिंगने येथे तयार केला होता बॉम्ब -
राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग हे भारतमातेचे असे वीर सुपूत्र आहेत, ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिले. या चौघांचाही आग्रा शहराशी अतूट नाते आहे. भगतसिंग आग्रा नूरी दरवाजा चन्नोमलच्या हवेलीत एक वर्ष राहिले. भगतसिंग यांनी ब्रिटीश सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी सरदार दिल्लीतील विधानसभेत जो बॉम्ब टाकला होता, तो आग्रा येथे राहूनच बनवला गेला होता. ‘आगरा मंडल के देशभक्त शहीदों पर स्मारिका’ या सरदार भगतसिंग शहीद स्मारक समितीने छापलेल्या पुस्तकात याचा उल्लेख आहे.
advertisement
आग्रा हे 1926 ते 1929 पर्यंत क्रांतिकारकांचे केंद्र बनले होते. क्रांतिकारक टोपणनावाने नूरी दरवाजा, हिंग की मंडी, नई की मंडी येथे भाड्याच्या घरांमध्ये आणि खोल्यांमध्ये राहत होते. इंग्रजांना संशय येऊ नये म्हणून ते ठिकाणे बदलायचे. चंद्रशेखर आझाद हे बलराज, भगतसिंग हे रणजित, राजगुरू हे रघुनाथ आणि बटुकेश्वर दत्त हे मोहन म्हणून येथे वास्तव्य करत होते. नूरी दरवाजा हे त्यांचे मुख्य केंद्र होते.
advertisement
याठिकाणी आजही ती खोली आहे, ज्यामध्ये एकेकाळी क्रांतिकारकांनी आश्रय घेतला होता. हे घर आता जीर्ण झाले आहे. त्याच्या संरक्षणासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. नूरी दरवाजा येथील तिकोनिया वर सरदार भगतसिंग यांचा छोटा पुतळा आहे. या बाजाराचे महामंत्री नवीन कुमार म्हणतात की, हे दुर्दैवी आहे की, इतके मोठे क्रांतिकारक ज्याठिकाणी थांबले होते, त्या जागेची इतकी वाईट अवस्था झाली आहे. याकडे प्रशासन कोणतेही लक्ष देत नाही आहे. ही जागा हेरिटेज वास्तू म्हणून घोषित करून विकसित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Independence Day : एकेकाळी क्रांतिकारकांचे केंद्र होती ही जागा, भगतसिंग यांनी याठिकाणी बनवला होता बॉम्ब
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement